मुंबई : येत्या १ एप्रिलपासून सीएसएमटी ते गोरेगाव अशी हार्बर सेवा प्रत्यक्षात सुरू होणार आहे. या मार्गाचं उद्घाटन गुरुवारी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते करण्यात आलं. या मार्गावरुन पहिल्या टप्प्यात ४२ सेवा चालवण्यात येणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीएसएमटी ते गोरेगाव २१ आणि गोरेगाव ते सीएसएमटी २१ अशा एकूण ४२ फेऱ्या या मार्गावर धावणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते अंधेरी सकाळी ९ .५६ मिनिट ते संध्याकाळी ६.३७ पर्यंत ही सेवा सुरू असणार आहे. तर, तीच गाडी पुढे गोरेगावपर्यंत चालवली जाणार आहे. त्यामुळे गाड्यांच्या वेळापत्रकात जास्त बदल केला गेलेला नाही. तर, गोरेगाव - सीएसएमटी हार्बर मार्गावरील सेवा सकाळी ९.४२ ते संध्याकाळी ७.१८ पर्यंत असणार आहे. शिवाय, अंधेरी ते सीएसएमटी या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केलेला नाही. 


पश्चिम रेल्वेने अतिरिक्त ५ सेवा ( ३ अंधेरी ते सीएसएमटी आणि २ सीएसएमटी ते अंधेरी) या गोरेगावपर्यंत चालवण्यात येणार आहेत. शिवाय, हार्बर मार्गावर अंधेरी ते गोरेगावपर्यंत विस्तारित सेवेचा तपशीलवार वेळ या वेबसाइट http://www.cr.ca उपलब्ध आहे. हार्बर रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केलेला नाही.