CSTM च्या नावात पुन्हा बदल, असं असणार नाव
छत्रपती शिवाजी टर्मिनसचे (सीएसटी) नवे नामकरण झाले. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) असे झाले असले तरी...
मुंबई : छत्रपती शिवाजी टर्मिनसचे (सीएसटी) नवे नामकरण झाले. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) असे झाले असले तरी मात्र इंग्रजीत CSTM असेच होते. आता त्यात बदल करण्यात येणार आहे. CSTM आता CSMT होणार आहे.
छत्रपती शिवाजी टर्मिनस स्टेशनच्या नावात बदल करून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असा नावात बदल काही दिवसांपूर्वी करण्यात आला होता. मात्र स्टेशन कोड CSTM असाच होता. आता या स्टेशन कोडमध्ये रेल्वेकडून बदल करण्यात आला आहे. आता हा कोड CSMT असा करण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी टर्मिनसचे (सीएसटी) नामकरण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) झाले असले तरी तिथे ‘सीएसटीएम’ (छत्रपती शिवाजी टर्मिनस महाराज) असेच लघुरूप झळकत होते. १ जुलैपासून सीएसटीएम हे नवीन लघुरूप रेल्वेच्या इंडिकेटरवर झळकत होते.