Video : चिमुरडीने राज ठाकरेंच क्षणात जिंकल मन
राज ठाकरेंना भेटायचं असा या चिमुकलीचा हट्ट अखेर पूर्ण
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची क्रेझ प्रचंड आहे. महाराष्ट्रात मनसे पुन्हा एकदा कात टाकून नव्या जोमाने सज्ज झाली आहे. राज ठाकरेंचा चाहता वर्ग मोठा आहे. यामध्ये अगदी लहानांपासून ते वृध्दांपर्यंत साऱ्यांचा समावेश आहे. आता राज ठाकरेंची फॅन असलेल्या एका चिमुकलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
राज ठाकरेंना भेटायचं असा या चिमुकलीचा हट्ट अखेर पुर्ण झाला आहे. घरी कायम आपल्या वडिलांच्या मागे तगादा लावणारी ही चिमुकली राज ठाकरेंना भेटली आणि त्यांचा पापा घेऊनच बाहेर पडली. या चिमुकलीचे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओत लहान मुलगी आपल्या वडिलांकडे राज ठाकरेंना भेटण्याचा हट्ट करत आहे. या व्हिडिओ ती मला राज ठाकरेंना भेटायचंय. असा हट्ट करत आहे.
तर दुसऱ्या व्हिडिओत चिमुकली राज ठाकरेंना भेटली आहे. राज ठाकरेंना पहिल्यांदा या मुलीने स्पर्श केला. तिला विश्वासच बसत नव्हता की, आपण राज ठाकरेंना भेटले आहोत. एवढंच नव्हे तर या चिमुकलीने थोडी हिम्मत करत राज ठाकरेंच्या गालावर पापा दिला आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत राज ठाकरेंनी या गोंडस मुलीला खास भेटवस्तू दिल्याचही दिसत आहे. या व्हिडिओतून राज ठाकरेंची क्रेझ सर्वाधिक असल्याचं पुन्हा अधोरेखित झालं आहे. राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी स्थापित केलेलं 'शॅडो कॅबिनेट' देखील चर्चेत आलं आहे. विरोधी पक्षाची भूमिका मांडण्यासाठी राज ठाकरेंनी मनसेला सज्ज केलं आहे.