मुंबई : इंटरनेट आणि मोबाईलचा वापर जसजसा वाढत चालला आहे, तसतसा ऑनलाईन फसवणूकीच्या (Online Fraud) घटनेतही वाढ होत चालली आहे. सायबर गुन्हेगार (Cyber Crime) सामान्य माणसांना फसवण्यासाठी नवनवी शक्कल लढवतात आणि सामान्य माणूस त्यात घाबरून किंवा आमिषाने फसतो आणि लाखो रुपये गमावून बसतो. अशीच आणखी एक घटना मुंबईत (Mumbai) समोर आली असून सायबर गुन्हेगारांनी एका महिलेल्या तब्बल 91 लाख रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी मुंबईतल्या शिवाजीनगर इथल्या सायबर पोलीस (Cyber Police) ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस सायबर गुन्हेगांचा शोध घेत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकी काय आहे घटना?
मुंबईत राहाणाऱ्या एका महिलेला मुंबई क्राईम ब्रँचमधून (Mumbai Crime Branch) फोन आला.  तुमच्या नावाने दुबईहून एक पार्सल आलं असून त्यात ड्रग्स सापडले आहेत, असं या महिलेला सांगत या महिलेच्या अकाऊंटमधून तब्बल 91 लाख रुपये लंपास करण्यात आले. फसवणूक झालेली महिला 31 वर्षांची असन तीचे पती व्यावसायिक होते. नुकतंच त्यांचं निधन झालं. पतीच्या निधनानंतर काही दिवसांनी त्या महिलेला एक फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण कुरियर कंपनीतून बलोत असल्याचं सांगत दुबईहून तुमचं एक पार्सल आलं आहे, त्यात 800 ग्रॅम ड्रग्ज (Drugs) सापडल्याचं सांगितलं.


पुढे त्या व्यक्तीने महिलेला अंधेरी इथल्या सायबर पोलीस अधिकारांशी संपर्क साधायला सांगितला आणि त्या महिलेला सायबर अधिकाऱ्याचा मोबाईल नंबर दिला. घाबरलेल्या महिलेने तात्काळ दिलेल्या नंबरवर संपर्क साधला. समोरच्या व्यक्तीने आपण सायबर पोलीस असल्याचं सांगत हे गंभीर प्रकरण असून तुमचं बँक खातं सील केलं जाण्याची शक्यता आहे, खात्यातील रक्कम तात्काळ बँकेच्या अकाऊंटवर ट्रान्सपर करण्यास सांगितलं. यासाठी त्या व्यक्तीने महिलेला तीन बँक खाती पाठवली. महिलेने आपल्या खात्यातील 20 लाख रुपये त्या दिलेल्या बँक अकाऊंटवर ट्रान्सफर केली.


पहिली चाल यशस्वी ठरल्यानंतर सायबर गुन्हेगारांनी त्या महिलेला आणखी लुबाडलं. त्यांच्याकडील 80 लाख रुपयांच्या मुदत ठेवी मोडायला लावून ते पैसेही 3 बँक अकाऊंटवर ट्रान्सफर करायला लावले. त्यानंतर महिलेने त्या अधिकाऱ्याला फोन लावला, पण त्याचा फोन बंद होता. वारंवार फोन केल्यानंतरही कॉल लागत नसल्याने आपण फसवलं गेल्याचं त्या महिलेच्या लक्षात आलं. याप्रकरणाची तक्रार महिलेने शिवाजी नगर इथल्या सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 


कोकेन तस्करी करणारी टोळी
दरम्यान मुंबईत कोकेना तस्कारी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफश झालाय. मुंबई विमानतळावरुन महसूल गुप्तचर संचालयाने तब्बल 20 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आफ्रिकन व्यक्तीसह एकूण तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी सुमारे 20 कोटी किमतीचं 1970 ग्रॅम कोकेन जप्त केलं आहे.


डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 35 वर्षीय आरोपी आदिस अबाबाहून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरला. त्याने आपल्या प्रवासी बॅगेत 1970 ग्रॅम कोकेन लपवलं होतं. डीआरआयच्या अधिकाऱ्यांना आरोपीवर संशय आल्यानंतर सापळा रचून अटक केली आहे. संबंधित आरोपी मुंबई विमानतळावर आपल्या साथीदारांना हे कोकेन देणार होता.