मुंबई : निसर्ग चक्रीवादळाने राज्यात मोठे नुकसान झाले. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. घरांची मोठी पडझड झाली असून वृक्षही कोसळून पडलेत. तर महावितरण कंपनीने मोठे नुकसान झाले आहे. चक्रीवादळांचे ज्या नागरिकांचे नुकसान झाले आहे. त्यांना राज्य सरकारने जास्तीची मदत करणार असल्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांना मोठा दिलासा मिळणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चक्रीवादळग्रस्तांना राज्य सरकारचा एनडीआरएफच्या ( NDRF) नियमापेक्षा जास्त मदत करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. पूर्ण नष्ट झालेल्या घराला दीड लाखांची मदत मिळणार आहे. यापूर्वी ९५ हजार मिळत होते. तर काही प्रमाणात पडझड झाली आहे त्यांना सहा हजाराहून आता १५ रुपये मिळणार आहे.


घरांची पडझड झाली नाही मात्र नुकसान झालं आहे, त्यांना ३५ हजार रुपये देण्यात येणार आहेत. NDRF च्या निकषांच्यावरती जो खर्च लागेल, तो राज्य सरकार देणार आहे. तसा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. नुकसान झालेल्याना १० हजार रोख रक्कम देण्यात येणार आहे.


शेतीचे हेक्टरी नुकसान झालेल्या शेताला २५ हजाराहून ५० हजार रुपयांची मदत करण्यात येणार आहे. तर कम्युनिटी किचन सुरु करण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच पुढील दोन महिने मोफत धान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे नुकसाग्रस्तांच्या चुली पेटण्यास मदत होणार आहे.