मुंबई : दहीहंडी पथकांसाठी राज्य सरकार सर्वात मोठा निर्णय घेणार आहे. दहीहंडीचा समावेश खेळामध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळे दहीहंडीला खेळाचा दर्जा मिळणार मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा ऐतिहासिक निर्णय मानला जात आहे. (Dahi handi will get status of Sport)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानभवनात उद्या याबाबत घोषणा होणार आहे. प्रो कब्बडी प्रमाणे आता प्रो दहीहंडी (Pro dahi handi) सुरू करण्यात येणार आहे.  त्यामुळे दहीहंडी आता एक दिवस नाही तर 365 दिवस खेळू शकणार आहेत.


मुंबईसह महाराष्ट्रात दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. त्यामुळे दहीहंडी उत्सवाला साहसी खेळाचा दर्जा देण्याची गेल्या अनेक वर्षापासून होत आहे. प्रो कब्बडीच्या धर्तीवर दहीहंडीची देखील स्पर्धा व्हावी असं दहीहंडी प्रेमींची मागणी आहे. 


कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदांना 10 लाखाचा विमा कवच देण्याची घोषणा केली होती. 


दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली असून ते याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असं खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटले होते. खेळाचा क्रीडा प्रकारात समावेश झाला तर तरुण वर्षभर सराव करतील. ज्यामुळे जखमी होण्याचं प्रमाण ही कमी होऊ शकतं. शाळा आणि महाविद्यालयात क्रीडा प्रकारात याचा समावेश केला गेला तर फायदा होऊ शकतो. असं ही दहीहंडी प्रेमींना वाटते.