मुंबई : मुंबईतल्या दहीसर रेल्वे स्टेशनवर आज पोलीस शिपायाच्या प्रसंगावधानामुळे अपघात होता होता वाचला. बोरीवलीच्या दिशेने जाणारी धावती गाडी पकडण्याचा प्रयत्न करणारा प्रवासी प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या गॅपमध्ये अडकला. त्याला पोलीस कर्मचारी योगेश हिरेमठ यांनी प्रसंगावधान राखून आणि जीव धोक्यात टाकून बाहेर खेचून काढलं. हिरेमठ यांच्या या धाडसामुळे या प्रवाशाचे जीव वाचले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दहिसर रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर दहिसर ते बोरीवली चा दिशेने जाणारी धावत्या लोकल ट्रेनमध्ये एक प्रवासी रेल्वेत चढायचा प्रयत्न करीत असताना त्याचा तोल जाऊन प्रवासी लोकल ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या गॅप मध्ये अडकून ट्रेन खाली जात असतानाच तेथून जाणारे दहिसर पोलिस ठाण्याचे पोलीस शिपाई योगेश हिरेमठ यांनी वेळीच प्रसंगावधान राखून स्वत:चा जीव धोक्यात टाकून त्या प्रवाशाला बाहेर खेचून त्याचा जीव वाचवला. असून अशा पद्धतीने पोलिसांनी केलेल्या कामाचे प्रवासी देखील कौतुक करतात .


शनिवारी देखील दहिसर रेल्वे स्टेशनवरील घटना आहे. रेल्वे ट्रॅक ओलांडताना अचानक ट्रेन आल्याने एका प्रवाश्याचा गोंधळ उडाला. अखेर पोलीस शिपाई एस.बी निकम यांनी प्रवाशाला हात देत प्लॅटफॉर्मवर ओढलं. त्यामुळे या रेल्वे प्रवाशाचा जीव वाचला आहे. ही संपूर्ण घटना रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे.



दहिसर रेल्वे स्टेशनवर एका प्रवाशानं लोकल पकडण्यासाठी स्वतःचा जीव पणाला लावला. प्लॅटफॉर्मवर येणारी लोकल पकडण्यासाठी या महाभागानं रेल्वे रुळ ओलांडले. ज्या ट्रॅकवर लोकल येणार त्या फलाटावर चढण्याचा प्रयत्न केला. धांदलीत त्याचा पायातला बूट निघाला. तो महाभाग त्या बुटासाठी पुन्हा रुळावर गेला.