मुंबई :  8 तासांपेक्षा अधिक वेळ काम करणाऱ्यांना ओव्हरटाईम (Overtime) द्याला लागणार आहे. डेली वर्क ऑवर्स (Daily Work Hours) 8 तास ठेवण्यावर विचार केला जात आहे. त्यानंतर ओव्हरटाईम सुरु होईल. ओव्हरटाईम करताना वेतन कमीतकमी दुप्पट देण्यात येईल. फॅक्टरी कायद्यानुसार कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांकडून 9 तासांपेक्षा अधिक वेळ काम करुन घेतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्याच्या व्यवस्थेनुसार जर कामगार आपल्या कामाच्या वेळेपेक्षा 30 मिनिटांपेक्षा अधिक काम करतो, त्याला ओव्हरटाईम मानलं जात नाही. पण, नव्या श्रम नियमांनुसार जर 15 ते 30 मिनिट अधिकचे काम केले तर त्याला ओव्हरटाईम मानला जाईल. 



त्यामुळे तुम्ही 15 मिनिटापेक्षा अधिकचे काम केल्यास त्याला ओव्हरटाईम मानला जाईल. 1 एप्रिल 2021 पासून हे नवे वेतन कायदे लागू होण्याची शक्यता आहे. 


यात वेतन, बोनस संबंधात 4 प्रकारचे नियम करण्यात आले आहेत.