मुंबई : सध्या डांसिंग स्टार डब्बू अंकल सोशल मीडियावर चांगलेच प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या डान्सने अनेक जण प्रभावित झाले आहेत. बॉलिवूड अभिनेता सलमान खान देखील याममध्ये मागे नाही. सलमान खानने डब्बू अंकल आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. डब्बू अंकलने आपल्या कुटुंबियांसोबत रियालिटी शो दस का दममध्ये हजेरी लावणार आहेत. सलमान खानला भेटल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला. सोशल मीडियावर त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य प्रदेशातील विदिशाचे राहणारे डब्बू अंकल यांच्या व्हायरल डान्स सध्या सगळीकडेच चर्चेचा विषय बनला आहे. डब्बू अंकल अशा प्रकारे एका रात्रीतून स्टार झाल्य़ानंतर एका इन्शोरन्स कंपनीने जाहिरातीसाठी त्यांना साईन केलं आहे. याचा व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे.



डब्बू अंकल यांनी इंस्टाग्रामवर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासोबतचा एक फोटो देखील शेअर केला आहे. 


डब्बू अंकल इतके प्रसिद्ध झाले आहेत की त्यांचे फेक अकाऊंट देखील बनवले जात आहे. त्यांनी याची तक्रार देखील दाखल केली आहे.