धोकादायक ! मुंबईत टीबी, डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ
मुंबईत टीबी रुग्णांची संख्या गेल्या चार वर्षात ३३ टक्क्यांनी वाढली.
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबईला आजाराचा विळखा पडलाय. मुंबईत टीबी रुग्ण, डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. प्रजा फाऊंडेशनचा आरोग्यविषयक अहवाल सादर झालाय. त्यात ही बाब पुढे आलेय. ४ वर्षांत टीबीच्या रुग्णांत ३३ टक्के वाढ झाली असून ५ वर्षांत डेंग्यूचे रुग्ण ९८ टक्क्यांनी वाढल्याची नोंद करण्यात आलेय. दरम्यान, रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची मोठी कमतरता, असल्याची नोंद प्रजा फाऊंडेशनने आपल्या अहवालात केलेय.
मुंबईचा आरोग्यविषयक अहवाल
- मुंबईत टीबी रुग्णांची संख्या गेल्या चार वर्षात ३३ टक्क्यांनी वाढली.
- २०१३-१४ ला ४१,४७९ रूग्ण होते, २०१७-१८ ला टीबी रूग्णसंख्या ५५,१३० वर गेलीय
- कुर्ला, सांताक्रूझ आणि भांडूप परिसरात टीबीचे सर्वाधिक रूग्ण
- गेल्या पाच वर्षात डेंग्यूच्या रूग्णसंख्येत ९८ टक्क्यांनी वाढ झाली असून रूग्णसंख्या ७६२१ वरून १४३४५ वर गेलीय
- बीएमसी रूग्णालयांमध्ये ३५ टक्के डॉक्टरांची तर राज्य सरकारच्या रूग्णालयात ५९ टक्के डॉक्टरांची कमतरता
- मुंबईकरांचा एकूण उत्पन्नाच्या ९ टक्के हिस्सा उपचारांवर खर्च होतो
- ७६ टक्के लोकांनी आरोग्य विमा घेतलेला नाही