मुंबई : दाऊद इब्राहिमच्या गँगमध्ये छोटा राजनचा अवाका वाढत होता, त्याला संपवण्यासाठी छोटा शकील, शरद शेट्टी आणि सुनील रावत एक झाले. यात 'डोंगरी ते दुबई'मधील एक किस्सा एस हुसैन झैदी यांनी शेअर केला आहे. दाऊद भाई आपली सर्व ताकत छोटा राजनजवळ देत आहे, उद्या तख्तापलट झाला तर सर्व गँगवर छोटा राजनचा कब्जा होईल, असं दाऊदला सांगण्यात आलं. यावर पुस्तकात लिहिलं आहे, यावर दाऊद उत्तर देतो, 'तुम्ही लोक केव्हापासून अशा अफवांवर विश्वास ठेवायला लागले, तो फक्त आपल्या गँगचा मॅनेजर आहे', पण दाऊदच्या या उत्तरानंतरही छोटा राजनविषयी इतरांच्या मनातला कडवेपणा कमी झाला नाही. काही वेळ शांतता राहिल्यानंतर दाऊदने छोटा शकीलला सांगितलं, 'छोटा राजनला फोन लाव'.


दाऊदने छोटा शकीलला सांगितलं, 'छोटा राजनला फोन लाव'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येथे एक गोष्ट महत्वाची होती, दाऊदने छोटा राजनला आपला भाऊ, साबिर इब्राहिम कासकरची हत्या करणाऱ्या, करीम लाला आणि आमीरजादाला ठार मारण्याचं काम दिलं होतं. छोटा राजनने फोन उचलला आणि दाऊद राजनला म्हणाला, 'इब्राहिम कासकरची हत्या करणाऱ्या लोकांना तू अजून पकडू शकलेला नाही', यावर छोटा राजन उत्तर देतो, 'हा भाई, माझी मुलं आहेत त्यांच्या मागावर, हल्ल्यासाठी जबाबदार गवळी गँगचे मुलं अजूनही जेजे हॉस्पिटलमध्ये भरती आहेत आणि सुरक्षा अतिशय कडक आहे, मी लवकरच काही तरी करेन'.


दाऊदजवळ त्याचवेळी एका खोलीत बसलेला सौत्या दाऊदला म्हणाला, 'मला फक्त एक संधी द्या, तुम्ही पाहत राहाल की सिक्युरिटी तोडून मी बदला घेतो, सौत्या दाऊदच्या पायाला हात लावून निघतो, छोटा शकील आणि सौत्यासाठी हिच संधी होती, छोटा राजनला दाऊदच्या नजरेत कमी करण्याची हीच संधी चालून आली होती'.


यानंतर काय झालं हे, खालील क्रमाने वाचा


६) दाऊदला छोटा राजनविषयी वाईट बोललेलं आवडतं नव्हतं...!


७) छोटा राजनला फोन, "नाना वो तुमको टपकाने का प्लानिंग किएला है"


८) छोटा राजनला अखेर पत्रकाराची हत्या महागात पडली


आणि पुन्हा क्रमांक १ खाली


१) मोठा राजनच्या हत्येनंतर छोटा राजन पुढे आला...


२) छोटा राजनच्या नावाची दहशत सुरू झाली या घटनेवरून...


३) दाऊद-छोटा राजनची पहिली भेट, मोठा राजनच्या हत्येचा बदला


४) छोटा राजन आणि दाऊदच्या मैत्रीत असं काही झालं....


५) छोटा राजन आणि दाऊदची 'ही दोस्ती तुटायची नाय'...पण