मुंबई : पीएमसी बँक घोटाळ्याचं दाऊद कनेक्शन आता समोर आलं आहे. एचडीआयएलची सिस्टर कंपनी असलेल्या दीवाण हाऊसिंग अॅण्ड फायनान्स लिमिटेड, अर्थात डीएचएफएल कंपनीसोबत दाऊदचा हस्तक इक्बाल मिर्ची याचे संबंध उघड झाले आहेत. मिर्चीविरोधात अफरातफरीच्या ८ प्रकरणांची चौकशी करताना ईडीनं मुंबई आणि बंगळुरूमध्ये छापे टाकले होते. यामध्ये काही ईमेल तपास यंत्रणेच्या हाती लागले असून त्यात मिर्चीचे डीएचएफएलसोबत संबंध उघड झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एचडीआयएल आणि डीएचएफएल या कंपन्या काही वर्षांपूर्वी एकच होत्या. एचडीआयएलचे प्रवर्तक राकेश वाधवान याचा पुतण्या कपिल वाधवान आणि धीरज बाबा दीवाण यांनी डीएचएफएल कंपनी स्थापन केली होती. हे आरोप दुर्दैवी असून स्वतःला सिद्ध करण्यासाठी तपास यंत्रणांना यापुढेही पूर्ण सहाकार्य करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया डीएचएफएलनं झी २४ तासकडे दिली आहे.