मुंबई : डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील जप्त मालमत्तेपैकी तीन मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे. हा लिलाव केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून नोव्हेंबर महिन्याच्या दुस-या आठवड्यात करण्यात येणार आहे. त्यासाठी जाहीरातीही देण्यात आल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दाऊदची मुंबईतच्या भेंडीबाजारतील शबनम गेस्ट हाऊस इमारतीची १ कोटी २१ लाख ४३ हजार ही लिलावासाठी किमान किंमत ठरवली आहे. पाकमोडिया स्ट्रीट- याकूब स्ट्रीट (सीएसनंबर ४३२७) येथील डामरवाला इमारतीतील खोली क्र. १८-२०, २५-२६ आणि २८ या सर्व खोल्यांसाठी १ कोटी ५५ लाख ७६ हजार रु. किमान किंमत ठरवली आहे. तर पाकमोडिया स्ट्रीटवरील रौणाक अफरोज हॉटेलसाठी १ कोटी १८ लाख ६३ हजार किमान किंमत ठरवली आहे. 


यापूर्वी २०१५ मध्ये पाकमोडिया स्ट्रिटवरील दाऊदच्या ‘दिल्ली जायका’साठी बोली लावण्यात आली होती. त्यावेळी एकाने ते हॉटेल ४ कोटी २८ लाखांची बोली लावून खरेदी केले होते. मात्र किमान रक्कम जमा करू न शकल्यामुळे अर्थमंत्रालयाने ती मालमत्ता पुन्हा ताब्यात घेतल्याचे कळते.