मुंबई : डॉन दाऊद इब्राहिमचा  (underworld don dawood ibrahim) भाऊ इक्बाल कासकर  (iqbal kaskar) याला ड्रग्सच्या (drug case) एका प्रकरणात मुंबईतील नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो  (NCB) कार्यालयात आणले गेले आहे. त्याची एनसीबीने चौकशी सुरु केली आहे. डॉन दाऊदला मोठा धक्का मानला जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 इक्बाल कासकर याला नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) मुंबईत मोठी कारवाई करताना त्याला ताब्यात घेत अटक केली. ड्रग्स प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा  (underworld don dawood ibrahim) भाऊ इक्बाल कासकरला (iqbal kaskar) एनसीबीने ताब्यात घेतले होते. दरम्यान, मुंबईतील ड्रग्ज प्रकरणात इक्बाल कासकर याचा हात असल्याचे पुरावे एनसीबीच्या हाती लागले होते. त्यानंतर एनसीबीने इक्बाल कासकरला चौकशीसाठी ताब्यात घेतले. आज त्याला NCBने कार्यालयात आणून चौकशी सुरु केली. आता या चौकशीत काय माहिती पुढे येते, याची उत्सुकता आहे.



इक्बाल कासकर हा आधीपासूनच ठाण्याच्या जेलमध्ये होता. काश्मिरवरुन मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ मुंबईत आणले जात होते. याप्रकरणी NCBने कारवाई करत जवळपास 25 किलो चरस पकडला होता. या प्रकरणाची कारवाई करताना वेगवेगळे पुरावे आणि धागेदोरे NCB अधिकाऱ्यांच्या हाती लागले. ड्रग्ज प्रकरणाचा संबंध थेट अंडरवर्ल्ड सोबत असल्याचे तपासात पुढे आले. त्यानंतर एनसीबीने ही मोठी कारवाई केली आहे.


ठाणे खंडणीविरोधी पथकाने 19 सप्टेंबर 2017 मध्ये नागपाडय़ातील घरातून इक्बालला अटक करण्यात आली होती. खंडणीसाठी एका बिल्डरला धमकी दिल्याचा आरोप आहे.