मुंबई : राजन नायर या मोठा राजनची १९८२ मध्ये हत्या झाली, आणि गँगची कमान छोटा राजन म्हणजेच राजेंद्र निकाळजेने हातात घेतली. छोटा राजनने ठरवलं की त्याला मोठा राजनच्या हत्येचा बदला घ्यायचाय. अब्दुल कुंजूने मोठ्या राजनची हत्या केली होती. कुंजू छोटा राजनला एवढा घाबरला, की त्याने ९ ऑक्टोबर १९८३ रोजी क्राईम ब्रान्चमध्ये जाऊन समर्पण केलं. कुंजूला जीव वाचवण्याचा हा योग्य मार्ग वाटला. कुंजूला संपवण्याचे छोटा राजनचे प्रयत्न सुरूच होते, जानेवारी १९८४ मध्ये छोटा राजनने कुंजूला मारण्याचा प्रयत्न केला, पण त्याला पूर्ण यश मिळालं नाही, तो कुंजूला फक्त जखमी करू शकला. पोलिसांनी कुंजूला उपचारासाठी २५ एप्रिल १९८४ रोजी हॉस्पिटलमध्ये नेलं, हॉस्पिटलमध्ये एक रूग्ण हाताला प्लास्टर बांधून बसला होता, ज्या क्षणी कुंजू जवळ आला, त्याच क्षणी त्या माणसाने हातावरचं प्लास्टर काढून अब्दुल कुंजूवर फायरिंग सुरू केलं. मात्र नशीबाने कुंजूला पुन्हा साथ दिली, पण या हल्ल्यामुळे जास्त प्रभाव पडला तो, दाऊद इब्राहिमवर.


दाऊद इब्राहिमने छोटा राजनला भेटण्यासाठी बोलवलं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईच्या अंडरवर्ल्डची कहाणी लिहिणारे बहुचर्चित पुस्तकाचे लेखक एस हुसैन झैदी 'डोंगरी टू दुबई'मध्ये लिहितात, यानंतर दाऊद इब्राहिमने छोटा राजनला भेटण्यासाठी बोलवलं, आणि यानंतर त्याला 'दाऊद'च्या 'गँग'मध्ये जागा मिळाली, आणि छोटा राजनचा कुंजूला मारण्याचा पुढील प्रयत्न देखील यशस्वी ठरला.


झैदी आपल्या पुस्तकात लिहितात, कुंजू क्रिकेटच्या मैदानात होता, क्रिकेटच्या पांढऱ्या पोशाखात मैदानात अनेक लोक होते, तेव्हा काही नवीन खेळाडू क्रिकेटच्या मैदानात त्याच पोशाखात सामिल झाले आणि थेट, कुंजू आणि त्याच्या साथीदारांवर गोळीबार सुरू केला. अखेर छोटा राजनने आपल्या अंडरवर्ल्डमधील मोठा भाई, मोठा राजनच्या हत्येचा बदला घेतला.


यानंतर काय झालं हे, खालील क्रमाने वाचा


४) छोटा राजन आणि दाऊदच्या मैत्रीत असं काही झालं....


५) छोटा राजन आणि दाऊदची 'ही दोस्ती तुटायची नाय'...पण


६) दाऊदला छोटा राजनविषयी वाईट बोललेलं आवडतं नव्हतं...!


७) छोटा राजनला फोन, "नाना वो तुमको टपकाने का प्लानिंग किएला है"


८) छोटा राजनला अखेर पत्रकाराची हत्या महागात पडली


आणि पुन्हा क्रमांक १ खाली


१) मोठा राजनच्या हत्येनंतर छोटा राजन पुढे आला...


२) छोटा राजनच्या नावाची दहशत सुरू झाली या घटनेवरून...


३) दाऊद-छोटा राजनची पहिली भेट, मोठा राजनच्या हत्येचा बदला