मुंबई : Mumbai Local Train Travel Ticket prices cheaper : मुंबईकरांसाठी खुशखबर आहे. लोकलचा (Mumbai Local) प्रवास आणखी स्वस्त होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीट शुल्कात मोठी कपात केली आहे. त्यामुळे आता कमी पैसे मोजावे लागणार आहेत. ( Decision Soon On Local Train Travel Ticket prices cheaper will be For Mumbaikars )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई लोकलमधील फर्स्ट क्लासचा प्रवास स्वस्त करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. रेल्वे मंत्रालयाकडून जानेवारीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. AC लोकलचेही भाडेदर कमी होण्याचे संकेत त्यानुसार मिळत आहेत.


दरम्यान, पुढील वर्षी मुंबई महापालिकेची (BMC) निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभुमीवर प्रवाश्यांना दिलासा देण्यासाठी जानेवारी हा निर्णय होईल, असे सांगण्यात येत आहे. AC लोकलचे भाडे कमी झाले तर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच लोकलमधील फर्स्ट क्लास प्रवासही स्वस्त होण्याची शक्यता आहे. रेल्वे मंत्रालयाकडून अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळातील सूत्रांनी दिली आहे. 


प्लॅटफॉर्म तिकीट 10 रूपयांत


दरम्यान, मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीट शुल्कात मोठी कपात केलीय. (Reduction in platform ticket fees) आता 50 रूपयांऐवजी प्लॅटफॉर्म तिकीट 10 रूपयांत मिळेल. कोरोना काळात प्लॅटफॉर्मवरची गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीटाच्या शुल्कात मोठी वाढ झाली होती.