मुंबई : कोरोनाचा देशभरातला वाढता फैलाव लक्षात घेता रेल्वेने एसी डब्यातले पडदे, ब्लँकेट्स काढण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील सूचना येईपर्यंत हे पडदे, उशा, ब्लँकेट्स काढण्यात येणार आहेत. डब्यात देण्यात येणाऱ्या या गोष्टी रोज धुतल्या जात नाहीत. तूर्तास प्रवाशांनी या गोष्टी स्वतःच्या स्वतः आणाव्यात, रेल्वेतर्फे पुरवण्यात येणार नाहीत असं रेल्वेने स्पष्ट केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, मुंबईच्या लोकल प्रवासात, गर्दीत कोरोनाचं काय करायचं असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. रेल्वेने कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी महत्त्वाची पावलं उचलली आहेत. त्यासाठी लोकल गाड्यांमुळे जंतूनाशक फवारणी केली जात आहे. मध्य रेल्वेने डबे निर्जंतुक करण्यासाठी काचा, हँडरेस्ट, हँडल्स, उभं राहण्याची जागा, सीट्स, लोकलच्या आतले आणि बाहेरचे पृष्ठभाग साफ करायला घेतले आहे. 



रेल्वे कर्मचारी सातत्याने सफाई करताना सध्या दिसत आहेत. यार्डात उभ्या असलेल्या गाड्यांमध्ये जंतूनाशकांची फवारणी केली जात आहे. कुर्ला कारशेडमध्ये हे काम सकाळी गाडी निघण्यापूर्वी आणि रात्रीच्या वेळी सुरू आहे. रेल्वेच्या डब्ब्यांमध्ये कोरोनाविषयी काळजी घेण्याबाबतची पत्रकही लावण्यात आली आहेत. तसंच रेल्वेच्या डब्ब्यांमध्ये स्पीकरवर कोरोनाविषयीच्या जनजागृतीसाठी माहितीपूर्वक संदेशही देण्यात येत आहे.


पश्चिम रेल्वेने 'तुम पास आए, यूं मुस्कुराए, हाथ मिलाए तो वायरस फैलाए' अशा आशयाचं ट्विट करत करोनासंबंधी जागरुकेसाठी, काळजी घेण्याचं सांगितलं आहे.