COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपक भातूसे, मुंबई : मुंबईतील अरबी समुद्रात होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकातील महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करून चौथऱ्याची उंची वाढवण्यात आल्याचं समोर आलं आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने 15 जून 2018 रोजी स्मारकाला दिलेल्या अंतिम परवानगीची कागदपत्रे झी24तासच्या हाती लागली आहेत. या कागदपत्रांवरून छत्रपतींच्या स्मारकाची उंची पूर्वीपेक्षा वाढवण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्ष पुतळ्याची उंची 44 मीटरने कमी करण्यात आली आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने दिलेल्या परवानगीतील स्मारकाच्या सुधारित आराखड्यात पुतळ्याची उंची कमी करून चौथऱ्याची उंची वाढवण्यात आली आहे.


- पूर्वी पुतळ्याची उंची 160 मीटर होती, ती आता 126 मीटर करण्यात आली आहे
- पूर्वी चौथाऱ्याची उंची 30 मीटर होती, ती आता 84 मीटर करण्यात आली आहे. 
- पूर्वी स्मारकाची एकूण उंची 190 मीटर होती ती आता 210 मीटर करण्यात आली आहे.


खाली पाहा हा पुरावा....



दोन दिवसांपूर्वी विधानसभेत पुतळ्याच्या उंचीवरून गोंधळ झाला होता. या स्मारकाच्या कामासाठी समुद्रात दोन टप्प्यात भराव करण्यात येणार आहे. यात पहिल्या टप्प्यात 7.18 हेक्टरवर भराव टाकला जाणार आहे, तर दुसर्‍या टप्प्यात 5.97 हेक्टर क्षेत्रावर भराव टाकला जाणार आहे. छत्रपतींच्या या स्मारकाला एकूण 3600 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे.