मुंबई : बेस्टच्या (Mumbai Best Bus) प्रदूषणविरहीत २६ इलेक्ट्रिक बस (Electric Buses of BEST) आजपासून मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते या इलेक्ट्रिक बसेसचे लोकर्पण मुंबईतल्या नरीमन पाँईट इथे झाले. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही ( Aditya Thackeray) उपस्थित होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका तासात ही बस संपूर्ण चार्ज होते. या बसचा वेग ७५ किलोमीटर प्रतिसास आहे. एकदा चार्ज केल्यावर ही बस १४० ते १५० किमी अंतर कापते. या बसमध्ये २५ प्रवासी आसन व्यवस्था आहे. बेस्टकडं सध्या ४६ इलेक्ट्रिक बसेसचा ताफा असून त्यात आता २६ आणखी बसेसची भर पडली आहे.



यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, २०१३ मध्ये ६ इलेक्ट्रिक बसेस, २०१६ मध्ये ४० आणि आता ३४०, हीच आमची इलेक्ट्रिक पब्लिक मोबिलिटीबद्दल वचनबद्धता. तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि सध्याचे अनिल परब यांच्यासोबत आणि माझ्या समन्वयानुसार MSRTCच्या मार्गांवर इलेक्ट्रिक बस आणून संपूर्णपणे इलेक्ट्रिक होणे हा मानस आहे.


तत्कालीन महापालिका आयुक्त अजोय मेहता तसेच तत्कालीन केंद्रीय मंत्री अनंत गिते आणि नंतर अरविंद सावंत यांच्यासोबत आम्ही केलेल्या बैठका मला आजही आठवतात. म्हणूनच या ३४० बसेससाठी मी या सर्वांचा आभारी आहे, आदित्य ठाकरे म्हणाले.