मुंबई : ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी अभिनेत्री दीपिका पदुकोणची आज चौकशी करण्यात आली. रकुल प्रीतसिंह (Rakul Preet Singh) हिच्या चौकशीत दीपिकाचे नाव पुढे आले होते. त्यानंतर दीपिकाला एनसीबीने  Narcotics Control Bureau (NCB) चौकशीला बोलावले. तिची चौकशी आज संपली. तिला पुन्हा चौकशीसाठी बोलवण्यात येण्याची शक्यता आहे. तब्बल साडे पाच तासांच्या चौकशीनंतर दीपिका एनसीबी कार्यालयातून घरी रवाना (Deepika Padukone exits NCB guest house after five and a half hours grilling session) झाली. मात्र दीपिकाला पुन्हा चौकशीला बोलावलं जाऊ शकतं, अशी माहिती सूत्रांनी दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, एनसीबीच्या चौकशीत दीपिका पदुकोणने मोठी कबुली दिल्याची माहिती समोर येतेय. २०१७ चे 'ते ' व्हॉट्सअप चॅट झाले होते, अशी कबुली दीपिकाने आपल्या चौकशीत दिल्याची माहिती समोर येत आहे. जया साहा, करिष्मा प्रकाश आणि दीपिका पदुकोण यांच्या ग्रुपचे आपण अॅडमिन आहोत हेही तिने कबूल केले आहे. मात्र आपण ड्रग्जचे कधीही सेवन केले नाही, असे दीपिकाने म्हटल्याचेही समोर येत आहे.


बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणी तिघा आघाडीच्या अभिनेत्रींची शनिवारी एनसीबीनं कसून चौकशी केली. दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान अशा तिघींची एनसीबीच्या एसआयटीतील पाच सदस्यीय पथकानं चौकशी केली. दीपिका आणि करिश्मा प्रकाश या दोघींची एनसीबी गेस्ट हाऊसवर चौकशी करण्यात आली. 


तर श्रद्धा कपूर आणि सारा अली खान या दोघींवर एनसीबीच्या झोनल ऑफिसमध्ये प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. सुरूवातीचे अडीच तास दीपिकाची स्वतंत्र चौकशी करण्यात आली. त्यानंतर करिश्मा आणि दीपिका या दोघींना समोरासमोर बसवून तीन तास चौकशी करण्यात आली.