मुंबई : भारतीय नौदलाची अपघाग्रस्त पाणबुडी आयएनएस सिंधुरक्षकला अखेर नौदलानं सन्मानपूर्वक अरबी समुद्रात जलसमाधी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिंधुरक्षक पाणबुडीला १४ ऑगस्ट २०१४ ला मुंबईच्या नौदल गोदीत अपघात झाला होता. यामध्ये पाणबुडीचं मोठं नुकसान होत तळावरच बुडाली होती. यामध्ये १८ नौसैनिकांचा दुर्देवी मृत्यू झाला होता. त्यानंतर तब्बल १० महिन्यानंतर पाणबुडीला पाण्याबाहेर काढण्यात आलं होतं. 


मात्र अपघातामध्ये मोठं नुकसान झालं असल्यानं सिंधुरक्षक पाणबुडी नौदल सेवेत परत आणणं अशक्य झालं  होतं. अखेर पाणबुडीला निवृत्त करत नौदलानं अरबी समुद्रात एका अज्ञात ठिकाणी सुमारे ३ किमी खोली असलेल्या ठिकाणी जलसमाधी दिल्याचं सुत्रांनी स्पष्ट केलं आहे. या पाणबुडीचा वापर काही काळ मरिन कमांडोंनी सरावाकरता केल्याची माहिती पुढे येत आहे.