मुंबई : तुम्ही व्हॅक्सिन घेतलंय का, घ्यायलाच पाहिजे..... पण कोरोनाचं व्हॅक्सिन डेल्टा प्लस या नव्या व्हेरियंटवर काम करणार का, याचा अभ्यास सुरू झालाय. कारण डेल्टा प्लस व्हॅक्सिनचा शत्रू ठरण्याची शक्यता आहे. 


डेल्टा प्लस झालाय व्हॅक्सिनचा शत्रू


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात सापडलेल्या कोरोना डेल्टा प्लस व्हायरसचा अख्ख्या जगालाच धोका आहे. या व्हायरसनं स्वतःला असं काही बदललंय की कोरोनावरची औषधं आणि लसही प्रभाव पाडू शकेल का याबद्दल शंका आहे. डेल्टा प्लस त्याच्यामधल्या स्पाईक प्रोटीनच्या मदतीनं पेशींवर आक्रमण करतो. 


डेल्टा प्लसचं रोगप्रतिकारशक्तीला आव्हान 


हा व्हायरस रोगप्रतिकारकशक्तीवर जबरदस्त हल्ला करतो. त्यामुळेच कोरोनावरची लस डेल्टावर परिणामकारक ठरण्याबद्दल साशंकता आहे. डेल्टा प्लस व्हेरियंटवर अँटिबॉडी कॉकटेलचाही परिणाम होत नाहीये. डेल्टा व्हेरियंट सगळ्यात आधी भारतात ऑक्टोबर महिन्यात सापडला होता. 


डेल्टा प्लसपुढे लसही ठरणार कुचकामी ?


भारतात दुस-या लाटेचा कहर डेल्टा व्हेरियंटमुळेच झाल्याचा अंदाज आहे. सध्या इंग्लंडमध्ये डेल्टा व्हेरियंटचे रुग्ण वाढतायत. फायझर आणि अॅस्ट्राझेन्काच्या लसी डेल्टा व्हेरियंटपासून संरक्षण देतात, असा दावा करण्यात आलाय. 


सध्या कोरोनावरच्या लसी या अल्फा व्हेरियंटसाठी बनवण्यात आल्यायत. पण डेल्टा व्हेरियंटला विचारात घेऊन लसी तयार करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे डेल्टाचा धोका कायम आहे.