कल्याण : राज्यात कोरोना संसर्गबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कल्याण-डोंबिवली शहरांतही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. त्यामुळे केडीएमसीत पुन्हा लॉकडाऊन करा, अशी मागणी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कल्याण डोंबिवलीतील आमदारांनी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनलॉकनंतर कल्याण-डोंबिवलीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आमदार राजु पाटील यांनी केडीएमसीमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्याची मागणी केली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींसोबत अत्रे रंगमंदिरात बैठक घेतली. यावेळी त्यांनी कोविड रुग्णालयात ऑक्सीजन आणि व्हेंटिलेटर वाढविण्याचे आदेशही दिले आहेत. 


राज्यातील परिस्थिती हाताबाहेर चाललेय, फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र


कल्याण डोंबिवलीतील चिंता आणखी वाढली आहे. शनिवापी कल्याण डोंबिवली क्षेत्रात सर्वाधिक 243 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. तर 24 तासांत दोन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्राचा कोरोना बाधितांचा आकडा 3288 वर पोहचला आहे. सध्या कल्याण-डोंबिवलीत 1848 रुग्ण उपचार घेत आहेत. तर 1338 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. कल्याण डोंबिवलीमध्ये आतापर्यंत कोरोनाने 71 जणांचा मृत्यू झाला आहे.



'महावितरण'चा भोंगळ कारभार, भरमसाट बिलामुळे नागरिकांमध्ये रोष