मुंबई :  कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली असली तरी साथीच्या आजारांचं प्रमाण वाढल आहे. विशेषत: डेंग्यूची साथ पसरत चालली असून तापाने मुंबईकर हैराण झाले आहेत. त्यामुळे मुंबईकरांना स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे.  मुंबईत जुलैच्या तुलनेत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या जवळपास चौपटीने वाढल्याचं चित्र दिसून आलं आहे.  जुलैमध्ये डेंग्यूचे 28 रुग्ण होते. ऑगस्टच्या आकडेवारीनुसार ही संख्या आता 132 वर गेलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


सर्वाधिक रुग्ण डोंगरी, परळ, वांद्रे याठिकाणी आहेत. डासांची पैदास वाढणार नाही, याची नागरिकांनी काळजी घ्या असं आवाहन पालिकेने केलं. डेंग्यूच्या तुलनेत इतर आजारांचं प्रमाण काहीस कमी झालं आहे. 


दोन महिन्यात पावसाळी आजारांची स्थिती कशी आहे पाहुया...




पावसाळ्यात या संसर्गजन्य आजारांचा सर्वांधिक धोका लहान मुलं आणि वयोवृद्धांना असतो. या काळावधीत त्यांच्या आऱोग्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं असते. ही लोकं पौष्टिक आहाराचे सेवन करतात का आणि तासभराने पाणी पितात का हे पाहणं आवश्यक आहे.