मुंबई : मुंबापुरी पुन्हा धुरकटलेली आहे. अवघ्या मुंबापुरीवर धुरक्याची चादर पसरल्याचे पाहायला मिळतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कमाल आणि किमान तापमानात झालेल्या घसरणीमुळे शहरातल्या गारठयात वाढ झालीय. असं असतानाच धूर आणि धुक्याच्या मिश्रणामुळे वातावरणात प्रचंड धुरके पाहायला मिळतंय. 


दाट धुरक्यामुळे मुंबईकरांचे हाल होतायत. धुरक्याचा परिणाम रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवरही पाहायला मिळतोय. दाट धुके असल्याने रेल्वे वाहतूक उशिराने धावतेय. 


आणखी दोन दिवस मुंबईवर धुरक्याचे साम्राज्य राहण्याचा इशारा हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आलाय. या धुरक्यामुळे प्रकृतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.