मुंबई : केंद्राच्या बजेटकडून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. १ तारखेला जाहीर होणाऱ्या बजेटकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत, देश अनेक नियमांनी ग्रासलाय. बाजारात मंदी आहे, त्यामुळे गुंतवणूकदारांना आकर्षित करणारे बजेट केंद्राने द्यावे अशी अपेक्षा अजित पवारांनी व्यक्त केली आहे.



केंद्रीय बजेटकडे लक्ष


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्राच्या बजेटकडे आमचं लक्ष आहे. बेरोजगारी, महागाई, उद्योग यासाठी काय पावलं उचलली आहे ते बघणार आहोत. त्यानंतर राज्याला मिळणाऱ्या निधीचं नियोजन करून राज्याचं बजेट सादर करणार आहोत. बजेटमध्ये बांधकाम व्यवसायाला गती देणं आवश्यक आहे. यावर आधारित अनेक व्यवसायांना फायदा होईल.


दरम्यान, राज्य सरकार टप्प्याटप्प्याने ६० ते ७० हजार सरकारी पदांची भरती करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाशिक दौऱ्यादरम्यान केली. मराठवाड्याचा दौरा आटोपल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिक दौऱ्यावर आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्राची आढावा बैठक होणार आहे. विभागातील पालकमंत्री, मंत्री आणि आमदार खासदार या बैठीकीला उपस्थित राहणार आहे. 


यावेळी त्यांनी कर्जमाफीचा उल्लेख केला. दोन लाखांवरील कर्जमाफीबाबत निवेदन आलं आहे. नियमित परतफेड करणाऱ्यांना ही कर्जमाफी मिळावी यासाठी  मंत्रिमंडळ बैठकीमध्ये प्रस्ताव ठेवला जाईल आणि मुख्यमंत्री यावर सकारात्मक निर्णय घेतील, असंही ते म्हणालेत.