कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला शिकवू नये - संजय राऊत
हा लढा संस्कृती वाचवण्याचा आहे - राऊत
मुंबई : कर्नाटकशी आमचे भांडण नाहीये, सरकारशी भांडण नाहीये, CM ठाकरे काय बोलले हे समजून घेतलं पाहिजे, हा लढा संस्कृती वाचवण्याचा आहे. मुंबईसाठी 105 हुतात्मा झाले आहेत, मुंबई केंद्रशासित मागणी करणारे हे कोण टीकोजीराव ?सीमालढा सुरू झाला तेव्हा ( टीका करणारे उपमुख्यमंत्री ) यांचा जन्मही झाला नसेल, पाळण्यात पण नसतील, त्यांनी आम्हाला काय शिकवावं.
आता यावरच्या ( सीमाप्रश्नवरच्या ) बैठका थांबवल्या पाहिजेत, यामुळे एक इंच तरी हा लढा पुढे गेला का अजिबात नाही, आम्हाला माहीत आहे काय पावलं टाकायची ते. एक बाजूला न्यायालयीन लढा सुरू राहील , तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री - सरकारने यांनी कर्नाटकच्या राज्यकर्ते यांच्याशी थेट संवाद साधला पाहिजे, सांस्कृतिक दहन त्यांनी थांबवलं पाहिजे.
दिल्ली शेतकरी आंदोलनावर भाजपची भूमिकेबद्दल बोलताना राऊत म्हणाले की, 'शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ करू नका, भूमिका घेतलीच पाहिजे, आंदोलन बदनाम करू नका, ज्यांनी लाल किल्ल्यावर आंदोलन केले त्यांच्या नेत्यांचे भाजप नेत्यांबरोबर फोटो आहेत. आंदोलनात फूट पाडण्याचा हा प्रयत्न आहे का अशी शंका निर्माण होते.'
व्हिडिओ : पाहा काय म्हणाले संजय राऊत