आर्यन खानच्या अटकेवर उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अडचणीत आला आहे. ड्रग्ज पार्टीमध्ये सहभागी झाल्यामुळे तसेच अंमली पदार्थ बाळगल्यामुळे एनसीबीने आर्यन खानला अटक केली आहे.
मुंबई : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अडचणीत आला आहे. ड्रग्ज पार्टीमध्ये सहभागी झाल्यामुळे तसेच अंमली पदार्थ बाळगल्यामुळे एनसीबीने आर्यन खानला अटक केली आहे. आर्यन खान हा शाहरुख खानचा मुलगा असल्याने तो अधिक चर्चेत आला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की, नेत्याची जरी मुले असतील तरी कायदा सर्वांना समान आहे. अभिनेता शाहरुख खानच्या मुलावर झालेल्या कारवाई बाबत अजित पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे.
एनसीबीकडे आरोपींच्या विरुद्ध पुरावे असल्याचं अधिकाऱ्यांनी कोर्टात म्हटलं आहे. त्यामुळे त्यांनी आरोपींची कस्टडी मागितली आहे.
एनडीपीएसच्या अंतर्गत गुन्हा सिद्ध झाला तर त्याला 1 वर्षे सक्त मजुरी आणि 25 हजार रक्कम अशी शिक्षेची तरतूद आहे.