मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना लिहिलेल्या पत्रावरुन आता राजकीय वाद सुरु झाला आहे. संजय राऊत यांनी आपल्या पत्रात विरोधक आणि ईडीवर निशाणा साधला आहे. तसंच त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनाही इशार दिला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्ही जर तुमच्या घरात घुसलो तर तुम्हाला नागपूरलाही जाता येणार नाही, मी काय बोलतोय ते देवेंद्र फडणवीस यांना माहित आहे, असा इशारा संजय राऊत यांनी दिला होता.


देवेंद्र फडणवीस यांचं प्रत्युतर
संजय राऊत यांनी दिलेल्या इशाऱ्याला आता देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. रोज सकाळी ९ वाजता येऊन संजय राऊत करमणुकीचा खेळ करतात, मी त्यांना इतकंच सांगतो सिंब कधी गिधडधमकीला घाबरत नाही, असा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 


संजय राऊत यांनी ईडी कारवाईवरुन केलेल्या आरोपांनाही फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. ईडी काय करेल हे ईडी सांगेल, ते का करतात हे देखील ईडी सांगेल, मला असं वाटतंय संजय राऊत सध्या व्हिक्टिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न करतायत. मोदींच्या सरकारमध्ये कुणाचाही बळी दिला जातं नाही. राऊतांनी व्हिक्टिम कार्ड खेळणं सोडून दिलं पाहिजे, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.


दिवसभर आपण कसं चर्चेत राऊ यासाठी संजय राऊत अशा प्रकारची वक्तव्य करतात, राऊत संपादक असल्याने हेडलाईन कशी द्यायची हे त्यांना माहित आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. 


महाराष्ट्रात भाजप विरोधी पक्षाच्या भूमिकेत  प्रखरतेने काम करेल, आणि पूर्ण शक्तीने आम्ही आमच्या बहुमताने महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 


अतुल भातखळकर यांचा टोला
संजय राऊत यांनी ईडीवरुन केलेल्या आरोपांना भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीही उत्तर दिलं आहे. अहो राऊत आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांना असल्या बायकी धमक्या देण्यापेक्षा ईडीला सामोरे जाण्याची हिंमत दाखवा, तुम्ही जे केलंय ते तुम्हाला भोगावं लागणार आहे, थयथयाट करुन काय उपयोग, असं भातखळकर यांनी म्हटलं आहे.


राज्यात सत्ता आहे म्हणून विरोधकांना मारहाण करून त्याचे निर्लज्ज समर्थन करणाऱ्यांना आता घाम फुटलाय. ED ची कारवाई जेलचा रस्ता दाखवणार या भीतीने ते गारठलेत. पापं मान्य करण्याचे धाडस नसल्यामुळे आकांडतांडव करतायत. काळा पैसा वाईट दिवस दाखवतोच. असं भातखळकर यांनी म्हटलं आहे.