अधिवेशनात फडणवीस संतापले, `हा पंतप्रधानांचा अपमान, माफी मागा, ऊर्जामंत्री, माफी`
केलेल्या वक्तव्यामुळे ठिणगी पडली आणि अधिवेशानाच्या कामकाजात घोषणाबाजी सुरु झाली.
मुंबई : हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे, नागपुरात हे अधिवेशन होत होतं, पण यावेळी कोरोना आणि मुख्यमंत्री कारणाने मुंबईतच हे अधिवेशन घेण्यात आलं. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ऊर्जा मंत्री नितिन राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे ठिणगी पडली आणि अधिवेशानाच्या कामकाजात घोषणाबाजी सुरु झाली.
नितिन राऊत नेमकं काय बोलले?
उर्जामंत्री नितिन राऊत हे पहिले १०० युनिट मोफत देण्याच्या मुद्यावर बोलत होते. नितिन राऊत म्हणाले, हो आम्ही सांगितलं होतं की, पहिले १०० युनिट मोफत देऊ, पण कोरोनाच्या काळात परिस्थिती आणखी हालाखीची झाल्याने आम्ही १०० युनिट मोफत वीज, हे पूर्ण करु शकलो नाहीत.
पण या सोबत ऊर्जा मंत्री नितिन राऊत यांनी जोडून एक उदाहरण देण्याचा प्रयत्न केला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील निवडणुकीआधी प्रत्येकाला अकाऊंटवर ५०-५० लाख रुपये येतील असं आश्वासन दिलं होतं.
हे ऐकून देवेंद्र फडणवीस यांचा अचानक संताप झाला. ते म्हणाले, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असं पैस देण्याचं, ५० -५० लाख खात्यावर देण्याचं वक्तव्य कधीही केलेलं नाही, असं वक्तव्य कधी केलं असेल, तर दाखवा, पुरावा द्या, नाहीतर सभागृहाची माफी मागा. हा सभागृहाचा अपमान आहे.