फोटोग्राफी करुन वाघ होता येत नाही, आता वाघ एकच...फडणवीसांचं ठाकरेंना जोरदार प्रत्यूत्तर
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सभेत विविध मुद्द्यांवर सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला आहे.
मुंबई : राज्याचे माजी मुुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना उत्तर सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कालच्या सभेतील मुद्द्यांना उत्तर देताना त्यांच्यावर टीका केली आहे. हिंदुत्व, मुंबई, संभाजीनगर, हनुमान चालिसा अशा सगळ्याच मुद्द्यांवर त्यांना प्रत्यूत्तर दिलं आहे.
'कोरोना काळात ते फक्त फेसबूक लाईव्ह होते. आम्ही अलाईव्ह होतो. ते म्हणायचे बाळासाहेब हे भोळे होते. मी धुर्त आहे. वाघ हा भोळाच असतो. पण धुर्त कोण असतो हे मी नाही सांगणार.'
मोदी आता एकच वाघ
'आता देशात एकच वाघ आहे. त्यांचं नाव आहे नरेंद्र मोदी. तुम्ही म्हणता ना मंदिरातील घंटा वाजवणारा नाही तर दहशतवाद्यांना कंठस्नान घालणार हिंदू हवा. तर ते नरेंद्र मोदीच आहे. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक करणारे नरेंद्र मोदी. ते खरे हिंदू. खरा पेहलवान ठोकर मारतो. लात गधा मारतो.'
'हा नवा भारत आहे. जो नरेंद्र मोदींनी केलाय. तुमच्याकडे सर्जिल आला. तरी तुम्ही काय केलं नाही.'
'आमच्या नावावर मत मागितले. आमची संपत्ती घेऊन दुसऱ्यासोबत पळून गेले. तरी म्हणायचं एकतर्फी प्रेम. कालचं भाषण सोनियाजींना समर्पित होते. आरएसएस बाबत जी भाषा काँग्रेस करतं तीच भाषा उद्धव ठाकरे करत होते. '
'उद्धव ठाकरेंना हे माहित तरी आहे का? हेगडे'वार यांचं नाव स्वातंत्र्य संग्रामाच्या यादीत होतं. याची माहिती तरी तुम्हाला आहे का? एमरजेन्सी लागली तेव्हा तुम्ही इंदिरा गांधीच्या बाजुने होतात.'
'मुद्दा नसला की, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची भाषा बोलायची. कोणाची हिंमत आहे मुंबईला वेगळी करण्याची. सामान्य मुंबईकरांना पैसा तुम्ही लुटला. काहीच सोडलं नाही.'
'संभाजीनगर म्हणतो म्हणजे झालं. नाव बदलण्याची गरज काय म्हणता. हे तर सोनिया गांधींना खूश करण्यासाठी. सोनियाजींना सांगितलं आमचा पाठिंबा काढू नका. औरंगाबादचं नाव बदलणार नाही.'
'तुम्ही म्हणजे मुंबई नाही. तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही. मुंबई आणि महाराष्ट्राचा एकच बाप आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.'.