मुंबई : मनसुख हिरेन (Mansukh Hiren) मृत्यू प्रकरणी विधानसभेत (Vidhansabha) जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. मनसुख हिरेन यांच्या पत्नीने दिलेल्य जबाबानुसार एटीएस (ATS) तपास करत आहे अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी विधान परिषदेत दिली. विरोधी पक्षनेत्यांनी त्यांच्याकडे काही कागदपत्रं असतील तर ती द्यावीत, या प्रकरणी निष्पक्ष तपास केला जाईल असं ही ते म्हणाले. यानंतर नाना पटोले यांनी विरोधी पक्षनेत्यांकडे सीडीआर कुठून आला, यांना सीडीआर मिळवता येतो का? असा सवाल उपस्थित करत प्रश्न उपस्थि केला. यावर देवेंद्र फडणविसांनी सचिन वाझेंच्या निलंबनाची मागणी लावून धरली. 'सीडीआर मिळवला असेल तर माझीही चौकशी करा', असं म्हणत त्यांनी सरकारला आव्हान दिलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्ही धमक्यांना घाबरत नाही. आमची चोकशी करा असं म्हणत फडणवीसांनी (Devendra Fadnavis) सरकारवर संताप व्यक्त केला. फडणवीस यांनी अन्वय नाईक केस दाबली, त्याची चौकशी करायची आहे आम्हांला असं अनिल देशमुख यांनी म्हटलं. त्यानंतर,'माझं तुम्हाला खुलं आवाहन आहे. माझी चौकशी करा. कर नाही त्याला डर कसला, असं देखील फडणवीसांनी म्हटलं.


भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली. अन्वय नाईक (Anvay naik) यांनी आत्महत्या केली तेव्हा फडणवीस यांनी हे प्रकरण दाबले. त्यांच्या पत्नी गृहमंत्र्यांकडे आल्या आणि चौकशी करण्याची मागणी केली. सचिन वाझे (Sachin vaze) या प्रकरणाची चौकशी करत आहेत, त्यामुळे त्यांना टार्गेट केलं जात असल्याचं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.


देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, वाझे क्राईम युनिटमध्ये आहेत, त्यांची चौकशी कशी करू शकाल. त्यांना निलंबित करा. इतके पुरावे समोर येऊनही त्यांनी एका पक्षात प्रवेश केला होता म्हणून त्यांना वाचवलं जातंय. सचिन वाझे यांना आधी निलंबित करा. तसे त्यांना घेतलं कसं. हाय कोर्टाच्या आदेशाने त्यांना निलंबित केलं होतं. आमच्या काळात प्रस्ताव आला तेव्हा अॅडव्होकेट जनरल यांनी घेता येणार नाही सांगितलं होतं. यांनी एक समिती नेमली आणि घेतलं. असा आरोप देखील त्यांनी केला.


मनसुख हिरेन यांच्या पत्नीनं पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सचिन वाझे यांनीच मनसुख हिरेन यांची हत्या केल्याचं हिरेन यांच्या पत्नीनं एफआरआरमध्ये म्हटलं आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन कायदेशीर कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.