मुंबई : एकिकडे सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी पुढे ढकलली जात असतानाच दुसरीकडे अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून समोर आलेल्या माहितीनुसार विधानपरिषदेत राज्यपाल नियुक्त जागांसाठी शिंदे फडणवीस सरकारची यादी तयार झाल्याचं कळत आहे. (CM Eknath Shinde devendra fadnavis )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

(CM Eknath Shinde mlas )नव्या यादीवर शिंदे फडणवीस सरकारचं एकमत झाल्याचीही माहिती आहे. लवकरच ही यादी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना पाठवण्यात येणार आहे. या 12 जागांसाठी जोरदार लॉबिंग झालं होतं अशीही माहिती आता समोर येत आहे. 



संख्याबळ पाहता 12 पैकी भाजपला 8 तर शिंदे गटाला 4 जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. 2019 मध्ये पराभूत झालेल्या तसंच शिंदे फडणवीस गटाच्या समर्थकांची यादीत वर्णी लागण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेची टर्म संपलेले अनेकजण सध्या लॉबिंग करत असल्याचं कळत आहे. (Maharashtra Political crisis)


शिंदे गटातील संभाव्य नावं
- राजेश क्षीरसागर (माजी आमदार)
- रामदास कदम (माजी पर्यावरण मंत्री)
- विजय शिवतारे (माजी आमदार)
- आनंदराव अडसूळ (माजी खासदार)
- अभिजीत अडसूळ (माजी आमदार)
- अर्जुन खोतकर (माजी मंत्री)
- नरेश मस्के (माजी महापौर)
- चंद्रकांत रघुवंशी (माजी आमदार)


आता वरील नावांतून शिंदे गटातून कोणाची वर्णी लागते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नरेश मस्के, विजय शिवतारे यांची एकनाथ शिंदेंशी असणारी जवळीक पाहता त्यांना प्राधान्य मिळणार का याकडे अनेकांचं लक्ष लागून राहिलं आहे.