मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) गोवा विधानसभा निवडणुकीच्या (Goa Assembly election) प्रसाचारासाठी पणजीमध्ये होत्या. पण आज सकाळी अचनाक भारतरत्न लता मंगेशकर (Lata mangeshkar Death) यांच्या निधनाची बातमी आली. मुंबईच्या पहिल्या नागरीक असलेल्या महापौर किशोरी पेडणेकर यांना त्यामुळे तातडीने मुंबईकडे यायचं होतं. पण पणजी येथून मुंबईकडे येण्यासाठी सकाळी विमान उपलब्ध नव्हतं. या कठीण प्रसंगात किशोरी पेडणेकर यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) यांच्याशी संपर्क केला. (Kishori Pednekar call to Devendra Fadnavis) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महापौर किशोरी पेडणेकर गोव्यातून येणाऱ्या चार्टरमध्ये देवेंद्र फडवणीस यांच्यासोबत मुंबईत दाखल झाल्या. या विमानातून गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत अणि गिरीश महाजन हे देखील मुंबईत दाखल झाले. 


देवेंद्र फडणवीस आणि महापौर यांच्यातील वाद, महापौर यांनी मिसेस फडणवीस यांच्यावर केलेली टीका, शिवेसना आणि भाजपमध्ये उडत असलेले दररोजचे खटके, अशातच नाजूक प्रसंगात महापौर आणि फडवणीस यांचा हा एकत्र प्रवास चर्चेचा विषय बनला.


महाराष्ट्राच्या राजकारणात कितीही संघर्ष होत असले तरी कठीण प्रसंगात एकत्र येण्याची परंपरा आहे. आज लता मंगेशकर यांच्या निधनाने फक्त महाराष्ट्राच नाही तर संपूर्ण देशाचं नुकसान झालं आहे. देशभरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. लता दीदी यांच्या निधनाने संपूर्ण देशात शोककळा पसरली होती.