मुंबई : मंत्रालयासमोर भाजीपाला टाकून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करून, या शेतकऱ्यांना अटक करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी आहे. कांदिवलीत भाजीपाल्याचा स्टॉल लावताना मुंबई महापालिकेचे अधिकारी आणि पोलीस त्रास देतात, याच्या निषेधार्थ शेतकऱ्याने आपला भाजीपाला मंत्रालयासमोर आणून टाकला. यानंतर सरकारने ते पोलीस आणि बीएमसीचे अधिकारी कोण, याचा कोणताही शोध न घेता, सरळ आंदोलन कऱणाऱ्या शेतकऱ्यांनाच आत टाकलं. हे शेतकरी उस्मानाबादचे आहेत. 


शेतकऱ्यांचं म्हणणं....


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमच्या आजूबाजूला अनेक लोक भाजीपाला विकत असतात, पण पोलीस आणि बीएमसी कर्मचारी, अधिकाऱ्यांकडून आम्हालाच टार्गेट केलं जातं, असं या शेतकऱ्यांनी सांगितलंय. आम्हाला आमच्याच राज्यात त्रास दिला जातो. आमचा या राज्यावर काहीच अधिकार नाही का? आम्हाला जाणून बुजून त्रास दिला जात आहे, असा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे.


शेतकऱ्यांवर देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे सरकारचा आसूड


एकीकडे राज्यातील भाजप सरकार थेट शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळावा, म्हणून आठवडी बाजार भरत असताना, दुसरीकडे राज्यातील शेतकऱ्यांना स्थानिक व्यापाऱ्यांकडून अधिकारी आणि पोलिसांचा वापर करून त्रास दिला जात असल्याचं चित्र आहे. गृहखातं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे, तर मुंबई महापालिकेची सत्ता उद्धव ठाकरे म्हणजेच शिवसेनेकडे आहे. फडणवीस, ठाकरे यांच्याकडे सत्ता असलेल्या प्रशासनाकडूनच शेतकऱ्यांना मुंबईत त्रास होत असल्याचं चित्र आहे.