मुंबई : अनिल देशमुखांच्या अटकेनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी झी 24 तासकडे EXCLUSIVE प्रतिक्रिया दिली आहे. अनिल देशमुखांविषयी सबळ पुरावे ईडीकडे असावेत यामुळेच अटक केली आहे. कोर्टाकडून कायदेशीर दिलासा मिळाला नसल्याने देशमुख यांना ही ईडीकडे जाण्याशिवाय पर्याय राहिला नाही असं फडणवीस म्हणाले. तर कायदेशीर चौकटीतच ईडीने देशमुखांवर कारवाई केली असेल असंही झी 24 तासला EXCLUSIVE प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस  म्हणाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर ईडीनं अटक केली आहे. अनिल देशमुख यांची सोमवारी 13 तास ईडीकडून चौकशी सुरू होती. या चौकशीनंतर अखेर रात्री दीड वाजता देशमुख यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून गायब असलेले अनिल देशमुख हे सोमवारी प्रथमच समोर आले आणि ईडीच्या कार्यालयात पोहोचले. यावेळी देशमुख यांच्यासोबत त्यांचे वकीलही उपस्थित होते.


मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर 100 कोटींचा वसुलीचा आरोप केला होता. या वसुली प्रकरणात चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलावण्यात आलं होतं. अखेर देशमुख स्वत:च ईडी कार्यालयात आले. त्यानंतर रात्री दीड वाजता देशमुखांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. 


अनिल देशमुखांनंतर अनिल परब, किरीट सोमय्यांचा दावा 


माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने रात्री उशिरा अटक केली. अनिल देशमुखांच्या अटकेनंतर दुसरा नंबर अनिल परब यांचा नंबर असं ट्विट भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलं आहे. या ट्विटमुळे चर्चांना उधाण आलं आहे. महाविकासआघाडी सरकारच्या आणखी एका नेत्याच्या नावाचा उल्लेख किरीट सोमय्यांनी उल्लेख केला आहे.