Gujarat Assembly Elections Result 2022 : गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपने (BJP) विक्रमी जागा जिंकत सत्ता कायम राखली आहे. भाजपला गुजरातच्या जनतेने बहुमत दिलंय. भाजपने गुजरातमध्ये 2017 च्या तुलनेत 50 पेक्षा अधिक जागा जिंकल्या आहेत. भाजप 2017 मध्ये 'नर्व्हस नाईन्टी'ची शिकार झाली होती. अर्थात तेव्हा भाजपचा 99 जागांवर विजय झाला होता. मात्र यंदा भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. यंदा भाजपने 182 पैकी 157 जागांवर विजय मिळवलाय. तर आपमुळे काँग्रेसला (Congress) जोरदार नुकसान झालंय. तर आपने (Aam Aadmi Party गुजरातमध्ये आपलं  खातं उघडलंय. भाजपच्या या ऐतिहासिक विजयावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (devendra fadnavis on bjp win in gujrat assembly elections result 2022 at mumbai political news )


फडणवीस काय म्हणाले? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"माननीय मोदीजींच्या नेतृत्वात भाजपला एक अभुतपूर्व असा विजय मिळवला आहे. भाजपने सर्व प्रकारचे रेकॉर्ड तोडले आहेत. 27 वर्ष राज्य केल्यानंतरही जनतेने सत्ता दिलीय. याचा अर्थ गुजरातमध्ये जे परिवर्तन झालं ते मोदीजी आणि भाजपने केलं.  भाजप पुढेही गुजरातच्या हिताचं निर्णय करु शकते. मोदींच्या नेतृत्वातचं देश पुढे जाऊ शकतो, हा विश्वास गुजरातचत्या जनतेने निवडणुकीतून दाखवून दिलाय.", अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. फडणवीस पत्रकार परिषदेत बोलत होते. 


"भाजपला 52 टक्के मतं मिळाली आहेत. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार भाजप 157 जागांवर जिंकलाय किंवा पुढे आहे. काँग्रेस आजपर्यंतच्या इतिहासात सर्वात निच्चांकी आहे. 16 जागा, ज्यांनी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार दिला होता आणि आम्ही जिंकून येणार असं लिहून दिलं होतं अशा आप पार्टीचे 12 वाजले. जनतेने आपला पूर्णपणे नाकारलं आहे. त्यामुळे आप दिल्लीपर्यंत मर्यादित असल्याचं गुजरातने दाखवून दिलंय", अशा शब्दात आपवर फडणवीस यांनी टीका केली. 


गुजरातच्या जनतेचे आभार


"मी गुजरातच्या जनतेचे आभार मानतो अभिनंदन करतो. मी देखील गुजरातला प्रचारासाठी गेलो होतो. त्यावेळेसच जनतेचा मूड स्पष्टपणे दिसत होता. गुजरात मोदी-भाजपमय होतं. जनतेने मूड बनवला होता. मी ज्या ज्या सभांना मोदीजींचं नाव घेतलं, त्यावरुन लक्षात यायचं की लोकांची मानसिकता काय आहे. निवडून आलेल्या सर्व उमेदवारांना मी शुभेच्छा देतो", अशा शब्दात फडणवीस यांनी मतदारांचे आभार मानले आणि उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.