मुंबई : राज्याच्या प्रमुखांनी समन्वय साधला पाहिजे, ही वेळ एकमेकांमध्ये गोंधळ घालायची नाही. सध्याचा कोरोनाचा काळ हा तीन पक्षांनी भांडावं असा नाही. राज्याची ती परिस्थिती नाही, प्रशासन आणि सरकार यांचा समन्वय मुख्यमंत्र्यांनी घालावा, असं म्हणत विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी सरकारला टोला लगावला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्य सचिव अजोय मेहता आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये वाद झाल्याची माहिती आहे. या मुद्द्यावरुन त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या वादावर स्पष्टीकरण दिलं आहे. मंत्री आणि सचिव यांच्यामध्ये संघर्ष नाही. बैठकीमध्ये असं काहीही झालं नाही. सूचना येत असतात, काही विषय हे ऐनवेळी येतात, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. 


त्याशिवाय, स्थलांतरित मजुरांची नोंदणीबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय या सरकारला चपराक आहे. जे सगळं आम्ही बोलत होतो ते सत्य निघालं, इतर कोणत्याही राज्यावर नाही तर फक्त महाराष्ट्रावर ताशेरे आहेत, आमचे मुद्दे खरेच ठरले. आम्ही फक्त विरोधाला विरोध म्हणून करतोय असं सत्ताधारी बोलले, आम्हाला महाराष्ट्रदोषी म्हणाले, आता सुप्रीम कोर्टही महाराष्ट्रादोषी आहे का? असा सवालही फडणवीसांनी केला आहे. 


मंत्र्यांसोबतच्या वादानंतर मुख्य सचिवांच्या पाठीशी शरद पवार!


 


दरम्यान, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस 11 आणि 12 जून रोजी कोकणाचा दौरा करणार आहेत. या दोन दिवसांत रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील विविध ठिकाणी ते नुकसानीची पाहणी करणार असून स्थानिकांशी संवाद साधणार आहेत.


'...त्यामुळे फडणवीसांच्या ज्ञानात भर पडेल', शरद पवारांचा टोला