मुंबई : रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरून राजकीय वर्तुळात चर्चा आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाआघाडीवर निशाणा साधला आहे.  खास करून ठाकरे सरकारवर टीका केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आणिबाणी 1977 मध्ये संपुष्टात आली, पण मानसिकता कायम!  आणिबाणीचे समर्थन करणारी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यावर त्याच मानसिकतेचे प्रदर्शन करीत आहेत. सरकारविरोधी प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाहीसाठी घातक. अशा प्रत्येक दडपशाहीविरुद्ध संघर्ष करणे हाच भारताचा नारा आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. 



काय आहे हे प्रकरण? 


अन्वय नाईक यांनी रिपब्लिकन tv चॅनलच्या स्टुडीओच्या इंटेरियर डिझाईनचे काम केले होते. यासाठी 5 कोटी 40 लाख एवढे बिल अर्णव गोस्वामी यांच्याकडून घेणे होते. परंतु  वारंवार बिल मागूनही अर्णव गोस्वामी यांच्याकडून बिल दिले जात नव्हते. त्यामुळे मानसिक तणावाखाली अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी नाईक यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत आपल्या आत्महत्येस अर्णब याला जबाबदार धरलं होतं. तसेच त्यांच्या आईने देखील आत्महत्या केली आहे.  या घटनेसंदर्भात अन्वय नाईक यांच्या पत्नीने तक्रार दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असून रायगड पोलिसांकडून कलम 306 अन्वये कारवाई करण्यात आली आहे