मुंबई : कोरोनाच्या संकटात विरोधी पक्ष डिझास्टर टुरिझममध्ये व्यस्त असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली होती. आदित्य ठाकरेंच्या या टीकेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. नया है वह, म्हणत फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना टोला हाणला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री ज्यांना योग्य वाटतं त्यांना मंत्री करू शकतात, पण मंत्री बनवल्यामुळे शहाणपण येतच असं नाही, असा टोमणा फडणवीस यांनी हाणला आहे. तसंच देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊत यांनी घेतलेल्या शरद पवारांच्या मुलाखतीवरही टीका केली आहे. शरद पवारांची मुलाखत ही तर मॅच फिक्सिंग आहे, अशी टीका फडणवीसांनी केली. 


शरद पवारांची मुलाखत संपली की मग मी प्रतिक्रिया देईन, असंही फडणवीस म्हणाले. तसंच कोणीही सरकार पाडत नाहीये. कोरोनाची लढाई दूर करण्याचा प्रयत्न म्हणून हा कांगावा केला जात असल्याचं प्रत्युत्तर फडणवीस यांनी संजय राऊत यांना दिलं आहे. 


दरम्यान संख्या लपवण्यासाठी कोरोनाच्या कमी चाचण्या केल्या जात आहेत, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे. देशातील ४६ टक्के मृतांचा आकडा महाराष्ट्रात आहे. अनेक मृत्यूंची नोंद केली गेली नाही. ६०० मृत्यू अजूनही अपलोड केले गेले नाहीत. लपवालपवी होऊनही येणारे आकडे मोठे आहेत. राज्यातली परिस्थिती चिंताजनक आहे, असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं आहे.