मुंबई : विरोधी पक्षनेते तसंच बिहार निवडणुकीचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्लाझ्मा थेरेपी सुरू करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीसांना शनिवारी कोरोनाची लागण झाल्यानं त्यांच्यावर सेंट जॉर्जमध्ये उपचार सुरू आहेत. देवेंद्र फडणवीसांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी देवेंद्र फडणवीस यांना प्लाझ्मा थेरपीचा एक डोस देण्यात आला होता. यानंतरही आजही त्यांना आणखी एक डोस देण्यात आल्याचे सांगितले जाते. देवेंद्र फडणवीस यांना शुगरचा त्रास असल्यामुळे त्यांची काळजी घेणं अधिक असल्याचं म्हटलं जात आहे. 


देवेंद्र फडणवीस यांना रेमडेसिव्हिर इंजेक्शन देण्यात आले. यानंतर त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी ९३ वरून ९७ पर्यंत वाढली असून आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 


'लॉकडाऊन झाल्यापासून मी दररोज काम करत आहे परंतु आता असे दिसते की, मी स्वतः थोडावेळ थांबावे आणि थोडा वेळ स्वतःसाठी घ्यावा अशी देवाची इच्छा आहे!' त्यामुळे कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यामुळे मी काळजी घेत आहे. देवेंद्र फडणवीस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सगळी औषधे घेत असून आयसोलेशनमध्ये आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना चाचणी करण्याची विनंती केली. २४ ऑक्टोबर रोजी देवेंद्र फडणवीसांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती.