मुंबई : राज्य सरकारच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना ‘जर आमच्या किंवा आमच्या कुटुंबीयांच्या वाट्याला कोणी गेलं तर त्यांनाही कुटुंब आहेत’ या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर फडणवीस यांनी अत्यंत शांतपणे दिलं. मी राजकारणात आहे आणि मी उत्तराला उत्तर देईल अशी भूमिका फडणवीसांनी स्पष्ट केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ते म्हणाले, 'कोणी आमच्या घरच्यांवर टीका करत नाही अशातला भाग नाही. शिवसेनेचे अधिकृत नेते माझ्या पत्नी संदर्भात काय लिहितात, बोलतात, ट्विट करतात हे सर्वांना माहित आहे. पण मी  त्या गोष्टीचा कांगावा करत नाही. मी राजकारणात आहे आणि मी उत्तराला उत्तर देईल.' असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 


दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी भाऊबीजच्या दिवशी ‘तिला जगू द्या’ हे गाणं प्रदर्शित केलं.  ‘तिला जगू द्या’ या गाण्याची निर्मिती  टी सिरीजने केली आहे. यावेळी अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. एवढचं नाही तर अनेक मुद्द्यावरून काही राजकीय लोकांनी त्यांच्यावर टीका केली. यावर फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडली.