मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप करत व्हिडिओ बॉम्ब टाकला. राज्य सरकारच्या षडयंत्राचे पुरावे असल्याचं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी  पेनड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांना सुपूर्त केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारने विरोधकांना संपवण्याचा कट रचला असून यात सरकारी वकिलांची मदत घेतली गेली होती. स्वत: सरकारी वकिलांनी याची माहिती दिली असून याचे व्हिडिओ पेन ड्राईव्हमध्ये असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, जयकुमार रावल, सुभाष देशमुख, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना संपण्याचा कसा कट रचला गेला आहे. याचे पुरावेच देवेंद्र फडणवीस यांनी वाचून दाखवल


सरकारी वकिलांवर गंभीर आरोप
आपल्यासमोर एक सुरस कथा मांडायची आहे, ही कथा एका अशा कत्तल खान्याची आहे, त्यात विरोधकांची कत्तल कशी करायची यासंदर्भातलं षडयंत्र आहे असं सागंत फडणवीस यांनी पुरावे वाचून दाखवले. 


या कथेत प्रमुख पात्र आहे विशेष सरकारी वकील प्रवीण पंडित चव्हाण. महत्वाच्या केसेस या व्यक्तीला देण्यात आल्या. ही कथा इतकी मोठी आहे की यावर २५ ते ३० वेबसीरीज तयार होतील. हे कथानक सत्यघटनेवर आधारीत आहे यासंदर्भातला प्रत्येक व्हिडिओ पेनड्राईव्हमध्ये आहे असं फडणवीस यांनी म्हटलं.


विरोधकांना संपण्याची प्रमुख जागा
सरकारी वकिलांचं कार्यालय हे विरोधकांना संपवण्याचं प्रमुख जागा आहे. चाकू प्लांट करण्यापासून ते गळ्याला रक्त लावण्यापासून, ड्रग्सचा धंदा कसा दाखवायचा, केस कशी करायची, कशीही करुन केस मोक्कामध्ये कशी फिट करायची, त्याचं नियोजन कसं करायचं, अशाप्रकारे गुन्हेगारीचा कट सरकारी वकिल रचतोय, पुढे त्यात पोलिसही आले आहेत. काही मंत्र्यांचाही सहभाग आहे.


या सर्वात एफआयआरही सरकारी वकिलांनी दिला. साक्षीदार सरकारी वकिलांनी तयार केले, घटनाक्रम कसे जोडायचे ते सरकारी वकिलांनी सांगितलं. जबान्या पाठ करुन घेतल्या, आणि आमचे एक माजी नेते जे आता तुमच्या पक्षात आहेत, त्यांनी ती व्यवस्था करुन दिली, असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधला.


षडयंत्राचा सव्वाशे तासाचा व्हिडिओ
ही सगळी जी कथा आहे ती सर्व सरकारी वकिल आपल्या तोंडाने सागत आहेत या पेन ड्राईव्हमध्ये ते आहे. प्रत्येक घटनेचे छोटे छोटे व्हिडिओ आहेत. महाविकास आघाडीच्याच कारागृहात गेलेल्या आणि कारागृहाबाहेर असलेल्या नेत्यांच्या संदर्भातले खुलासे देखील त्याने केले आहेत. यासर्वांचं सव्वाशे तासांचं  रेकॉर्डिंग आहे. 


यानंतर काही व्हिडिओतलं संभाषण देवेंद्र फडणवीस यांनी वाचून दाखवले


पहिला व्हिडिओ : गिरीश महाजनांविरोधात कट रचताना तो वकिल काय सांगयोय.... वकिलांचा संवाद : आम्हाला पैसा निलेश पुरवायचा, गुंडागर्दी करणे, दहशत पसरविणे असे सांगायचे आहे. ड्रग्जचा व्यवसाय करतो, हे तो सांगेल का? असे सांगितले तरच मोक्का लागेल. सट्ट्याच्या पैशातून मोक्का लागत नाही. पण, सट्ट्याच्या पैशातून ड्रग्ज म्हटले की मोक्का लागेल. 1 ग्रॅमला १ लाख रूपये मिळतात, असं सांगायचं.


दुसरा व्हिडिओ : तो गिरीश महाजन यांचे नाव घ्यायला तयार आहे ना? एक छोटा जबाब तयार करतो. तो माफीचा साक्षीदार व्हायला तयार आहे का? ड्रग्जचे नाव घेतले की, आपला मोक्का एकदम फिट बसतो. आणि ड्रग्ज सापडलेच पाहिजे, असे कुठे आहे? सापडले तरच गुन्हेगार असतो, असे नाही. केवळ संशय क्रिएट करणे पुरेसे. शिक्षण संस्था आहे, तेथे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मार्केट खूप मोठे आहे, असे सांगायचे. त्याला पैसे दिले आहेत ना आपण?सुनील गायकवाड, महेंद्र बागुल, सूर्यवंशी. रवि शिंदेने त्याचे नाथाभाऊंशी बोलणे करून दिले.
संस्था आपल्या ताब्यात आहे तोवर कोट्यवधी रुपये कमवू शकतो, असे भासवायचं, आणि गिरीश महाजनला फसवायचं. 


सारे जबाब मी लिहून दिले होते, साहेबांनी डीजींना सांगितले. किती मिटिंगा झाल्या. सीपी ला रात्रभर बसविले. साहेब यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला होतो. मी मागच्या दारातून गेलो. त्यांनी फोन लावले. मी गाडीत बसलो, तर लगेच डीजी चा फोन आला. सीएम, अजितदादा/वळसे पाटील/एसीएस, डीजी होते. सीपीला रात्रभर बसवून ठेवले. रजत नागपूरला निघून गेला. मग सीपीचे फोनवर फोन आले.


सर्व निगेटिव्ह होते. मी कॉपी दिली. शेवटी साहेबांना सांगून अधिकारी बदलविला. अनिल देशमुख असते, तर फायदा झाला असता. प्रवीण चव्हाण आला तर त्याला अँटीचेंबरला बसवा, असे साहेबांचे ऑर्डर होते. अनिल देशमुखांचे माझ्याशिवाय पान हलायचे नाही.


तिसरा व्हिडिओ -  अजित पवार सपोर्ट करीत नाही. पर बडे साब सब देख रहे है. कोणी चांगले अधिकारी आहेत का? चार/पाच अधिकार्‍यांची चांगली नावे असेल तर द्या, असे त्यांनी मला सांगितले. त्यांनाच आपण अपाईंट करु.


चौथा व्हिडिओ - अ‍ॅड. प्रवीण चव्हाण हे कट कसा रचत आहेत, याचे एसीपी सुषमा चव्हाण यांच्याशी झालेले संभाषण आहे. रेडमध्ये सहभागी होणार्‍या पोलिस कर्मचार्‍यांची संपूर्ण व्यवस्था ते सांगत आहेत. कुठल्या मार्गाने जायचे आणि काय काय करायचे, याची सूक्ष्म व्यवस्था सरकारी वकिलांनी ब्रीफ केली आहे. अगदी सरकारचे रेस्टहाऊस सुद्धा बुक करून दिले आहे. वेज/नॉन-वेज जेवणापर्यंत सूक्ष्म नियोजन, जेवणाची/राहण्याची आणि रूम कुणाच्या नावाने बुक करायच्या, कॅशमध्ये कसे पैसे द्यायचे, याची संपूर्ण कथा ते सांगत आहेत. यासाठी कोणती मदत लागली तर खडसे साहेबांची मदत घ्या, असेही निर्देश दिले आहेत. खडसे साहेब सर्व पैसे देतील, असेही प्रवीण चव्हाण यांनी सांगितले.


पाचवा व्हिडिओ  - त्याला ब्लड लावून ठेवले असते आणि चाकू जप्त केला असता. एक चाकू विकत घ्यायचा आणि जोवर चर्चा सुरू आहे, तोवर तेथे फेकून द्यायचा. जप्त करायला काय लागते? किती जणांनी माझे नाव या केससाठी रेकमंड केले? दिलीप बोरले, वळसे पाटील, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अर्जून खोतकर, अनिल देशमुख, रमेश जाधव, गुलाबराव, हसन मुश्रिफ, श्रीनिवास पाटील यांची नावे घेत, त्यांची पत्र मोबाईलवर दाखवितात. या सर्वांनी साहेबांना पत्र दिले. गिरीश महाजन अटकत नाही. सीपीला काढल्याशिवाय पर्याय नाही. डीजीला भेटणार आहे. नाव घेत नव्हते.


सहावा व्हिडिओ - साहेबांना फोन करून मिटिंग लावली. मोक्कासाठी ऐकायला तयार नव्हते. 1 दिवसांत एफआयआर ड्राफ्ट करून दिला. स्वत: अभ्यास करून कलमं लावली. अनेक कलमं लावली. पण त्यांनी पॅरेच्या पॅरे गहाळ केली.


सातवा व्हिडिओ  - विजू पाटीलशी दूरध्वनी संवाद, गिरीश महाजनचे नाव टाका. मी जबाब तयार करतो. पुढे काय बोलायचे, स्टेटमेंटमध्ये काय टाकायचे, हे सारे निर्देश देतो आहे. भोईटे जाईल, तेव्हा आपला माणूस जाईल आणि तेथे ऐवज ठेऊन देईल.  कुणाकडून काय जबाब घ्यायचे, हेही समजावून सांगितले आहे.


आठवा व्हिडिओ - एसीपी सुषमा चव्हाण, पौर्णिमा गायकवाड, अ‍ॅड. प्रवीण चव्हाण संभाषण, हॉटेलचे बिल देऊ नका, 10 हजार दिले आहेत.
तेथे आपला माणूस ठेवा. तो दोन फाईलमध्ये गिरीश महाजन यांचे फोटो ठेवायचे आहे. पंचांची नावे मी व्हॉटसअ‍ॅपवर पाठवितो. दोन सायबर एक्सपर्ट ठेवा. ती आपली माणसं असतील. जे आपल्याला माहिती आहे, ते पोलिसांना कुठे माहिती आहे. दोन टेक्नीशियन सोबत ठेवायचे आणि ते ऐवज ठेवून देतील.


नववा व्हिडिओ -  एसीपी सुषमा चव्हाण यांच्यासोबत फोन कॉल - पंचनामा मॅनेज करा, की 6.30 वाजता ऑर्डर मिळाली पाहिजे. डीडीआर ओळखीचा असेल तर बोलाविणे.  जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद अशा ठिकाणांहून 5 पंच लागतील. उद्या रविवार असल्याने ओळखीची माणसं आधीच ठरवून घ्या. वकिल स्वत:च फोन करून माणसं ठरवितात. काही बोलू नका. कारण मॅटर सेंसेटिव्ह आहे. फक्त शिपाई आयडेंटिफाय करून ठेवा.


दहावा व्हिडिओ -   कुठल्यातरी मॅडमशी संवाद - पवारसाहेबांकडे खडसे साहेबांना घेऊन जातो. मी, जयंत पाटील असे अजितदादांकडे जातो. मी स्वत: येणार नाही. कारण, मी आलो तर मी राष्ट्रवादीचा वकील आहे, याचा पुरावा मिळेल.


अकरावा व्हिडिओ - विजू पाटीलशी संभाषण - अशी बातमी लीक करा, की अलका पवार आणि इतर डायरेक्टर यांच्यावरही रेड पडणार आहे आणि स्टे व्हॅकेट झाला आणि अटक होणार आहे, अशी सुद्धा बातमी पसरवा. त्यामुळे मेंटालिटी खराब होईल. भोईटेला माफीचा साक्षीदार करायचे असेल तर वकिल लावावा लागेल. तो होत असेल तर आपण त्याला मदत करू.



विजू पाटील शी संभाषण -  चॅनेलला बोलावून सर्व दाखवा. त्यांना काय दाखवायचे ते सांगा. गिरीश महाजन यांच्या पापाचा घडा भरला आहे, असे सांगा, मागच्या भागात शिवाजी भोईटेने फोटो फेकले असतील, ते दाखवायला सांगा.


बारावा व्हीडिओ - या घटनेप्रमाणे साक्षीदार तयार करावे. गिरीश महाजनचे नाव घ्यायला सांगा. रामेश्वर आणि गिरीश महाजनचे नाव घ्या. सर्व जबाब वाचून काय अ‍ॅड करायचे ते करा.
 
तेरावा व्हिडिओ -  कुणाला अटकवायचे? जयकुमार रावल, गिरीश महाजन, देवेंद्र फडणवीस, संजय कुटे, मुनगंटीवार नागपूरहून मला फोन आला. पुढच्या आठवड्यात कुठे आहे, असे विचारले. मुंबईला केव्हा येणार? शुक्रवारी ये. मी गेलो, तेव्हा पीएस राऊत तेथे नव्हता. त्याने दुसर्‍याचा नंबर दिला. मी जातो मंत्रालयात तेव्हा कधीच माझी एन्ट्री नसते. ना जाण्याची-ना येण्याची. चर्चा केली.


चौदावा व्हिडिओ - मी सारे काही टाईप करून दिले. त्यांना फक्त ए4 वर टाईप करायला सांगितले. खंडणीचे सुद्धा मी तयार करून दिले. सुनील गायकवाड पुण्यात केव्हा आला, याची माहिती काढली. मग एफआयआरमध्ये लिहिले. 2 लाख कुठे दिले, 3 लाख कुठे दिले? मग आपण काय काय दाखविले. किमया हॉटेल दाखवायचे होते. पण, उद्या कायद्यात अडकू नये, म्हणून कुठे कॅमेरे तर नाही ना हे आधीच बघून आलो. उगाच रिस्क नको. संपूर्ण सर्वे केला.


पंधरावा व्हिडिओ  -  कोणत्या दिवशी किडनॅप केले ते सांगा, असा प्रश्न विचारला तर सांगायचे पहिल्या आठवड्यात. तारीख कशाला सांगायची? काही भाग गिरीश महाजनला कळला, तर त्याने एफआयआर कॉपी मागवून घेतली. स्टे घेतला. आता प्रयत्न करतात. मी कधी कुठे दिसतो का? मी एकतर सकाळी जातो किंवा रात्री उशीरा. माझी एक जरी क्लिप हाती आली तरी हे कळून जाईल की हे सारे साहेबांच्या सांगण्यावरून होते आहे.


सोळावा व्हिडिओ  - गिरीश महाजन पुण्यात केव्हा आला, ती माहिती आपण घेतली. मंत्रालयातून काढली. अनिल देशमुख घाबरत नव्हते. त्यांना टार्गेट दिले की ते करायचे. जयंत पाटील/खडसे चांगले संबंध. त्यांनी डायरेक्ट सांगितले होते की, चव्हाण आला की पाहून घ्यायचे.  फडणवीस गेला तर एक मतदारसंघ अनिल देशमुखच्या मुलासाठी मोकळा झाला असता. पैसा खूप लागतो एका स्टेजनंतर


- आपले टार्गेट कोण कोण आहेत?
देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, जयकुमार रावल, सुभाष देशमुख, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे.
फाईली तयार आहेत. हेच आपले टार्गेट आहे.


सतरावा व्हिडिओ - साहेब कधीच पिक्चरमध्ये येत नाहीत. ते कुणाला तरी घरी बोलावून सांगतात. थेट फोन केला तर उगाच स्टेशन डायरीत नोंद नको. पण, साहेबांना यांना संपवायचेच आहे, गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांना. 1 लाख 1 टक्के संपवायचं आहे.  गिरीश महाजन आणि फडणवीस यांना अडकवणारच. पुढच्यावर्षीपर्यंत काढायचेच आहे. म्हणजे मग फडणवीस संपतो.


अठरावा व्हिडिओ -  अनिल देशमुखांनी बदल्यांमध्ये पैसे कमाविले. 100 कोटींपेक्षाही अधिक. किमान 250 कोटी तरी. नुसते बदल्यांमध्ये नाही, तर वाहन खरेदी, बांधकामाचे टेंडर भरपूर मार्ग असतात. 2 वर्षांत 250 कोटी रुपये तरी कमविले असतील. काय लागतं. मुंबईत 100 तरी मोठे बिल्डर्स आहेत. प्रत्येकाने 2/3 कोटी दिले तरी 200-300 कोटी सहज जमा होतात. बिल्डर्ससाठी 2 कोटी काही मोठी रक्कम नाही. एक नक्की की, अनिल देशमुख आपल्या कामी आला असता.  मी साहेबांचा माणूस. पण, माझा फोटो ठेवत नाही. संबंध दाखवित नाही, कधी स्टेटस ठेवत नाही.


ऑडिओ 1 -  साहेबांची वेळ घ्या, तोवर काही शक्य नाही. अनिल देशमुख गेल्याने खूप नुकसान झाले. वळसे काहीच करीत नाही. आतापर्यंत अटक होऊन संपून गेले असते. कोर्टात काय भूमिका मांडायची, हे तेच ठरवतात. ते म्हणतील ते ठरते.


ऑडिओ 2  - गिरीश महाजन डायरेक्ट नाव येईल, असे स्टेटमेंट घ्या. विश्वजितचे स्टेटमेंट घ्या. 18 चे स्टेटमेंट झाले तर मजा येईल. एक लेडिज कोण आहे, तिचे स्टेटमेंट घेतले तर त्याला अटक होऊन जाईल.


 ऑडिओ 3 -  राजकारण करायचे असेल तर सीपी, सीआयडी, ईओडब्ल्यू हे सारे तुमचे पाहिजे. मोठ्या साहेबांनी सांगितले. देशमुख 25 लाख रुपये घेऊन आले होते. पण, मी घेतले नाही. नंतर तो पकडला गेला. 25 लाखांत आपली गाडी झाली असती. तो स्वत: देत होता, तरी आपण घेतले नाही. नशिब कसे असते पहा. पण, त्याच दु:ख नाही. आपलीच माणसे आहेत. तो माणूस पाहिजे होता.


 ऑडिओ 4 -  सातभायेने छगन भुजबळला पैसे घेऊन सोडले. मुंबईला एक पाटणकर नावाची वकील आहे. जज मॅनेज करणे, एवढेच तिचे काम आहे. 1 कोटी ठरले, तर 50 लाख ती ठेवते आणि 50 लाख देते. गिरीश महाजनची फाईल होती, ती पुढे सरकवायला पाहिजे.
रावलला आतमध्ये टाकले असते आणि महाजनला उचलले असते. हे दोन उचलले असते, तर हादरून गेले असते.


व्हीडिओ 26 ए - अनिल गोटे यांच्याशी कॉल - ते संजय राऊतने साडेतीन नेते सांगितले ते कोण?
तावडे/गिरीश महाजन/रावल/देवेंद्र फडणवीस/रणजित पाटील
सर्व फाईली आहेत आपल्याकडे. झेरॉक्स देतो. कुठे भेटणार? तीच आरबीआयजवळील 302 नंबरची खोली.
साहेबांची इच्छा आहे, करू आपण सगळे, खचून नका जाऊ.
संजय राऊतांची वेळ घ्या, मी सोबत येतो. आपल्याजवळ सगळे आहे, करू आपण सगळे.
साहेबांशी माझे बोलणे झाले आहे. साहेब म्हणाले मी सांगतो.
सीएम फाऊंडेशनचा गुन्हा आपण सोलापूर ग्रामीणमध्ये करतोय, साहेबांचे बोलणे झाले आहे.


 व्हीडिओ 27 बी
अनिल गोटे आणि वकिलाचा संवाद
अनिल गोटेंची एन्ट्री, सीएम रिलिफ फंडची फाईल घ्यायला आलो.
वकिल महोदय सांगतात, सापडत नाही. शोधून देतो. ओरिजिनल साहेबांकडे आहे. माझ्याकडे झेरॉक्स आहे.
आपल्याकडे 4 फाईली आहेत. पांडे साहेबांना सांगून रजिस्टर करून घेतो. पांडे साहेब शंभर टक्के करणार म्हणजे करणार. तो एकमेव माणूस आहे. 


व्हीडिओ 28 सी
वकिल : मंगेश चव्हाणची फाईल देतो.
गोटे : मंगेश चव्हाणच्या फाईलमध्ये मला इंटरेस्ट नाही.
वकिल : मंगेश चव्हाण म्हणजे गिरीश महाजन आणि गिरीश महाजन म्हणजे देवेंद्र फडणवीस


व्हीडिओ 29 डी 
गोटेंना फाईल देताना वकिलाचा असिस्टंट म्हणतो की, आपण एक कॉपी काढून ठेऊ या.
वकील म्हणतात, गोटे आणि आपण काय वेगळे आहोत काय, त्यांच्याकडे फाईल असली म्हणजे आपल्याकडेच आहे. ते मंत्री झाले, म्हणजे आपण मंत्री झालो.
मी तुम्हाला एक्सपर्ट माणूस देतो, तो धुळ्याला येईल आणि तुम्हाला संपूर्ण फाईल समजावून सांगेल.


व्हीडिओ 30 ई 
साहेब तयार आहेत. जूनमध्ये संजय पांडे रिटायर होतो आहे. आता तो मुंबई सीपी झाला आहे. त्याने सांगितले की, मी केस रजिस्टर करून देतो. त्याच बोलीवर आपण त्याला बसविले आहे. मी रजिस्टर करायला लावतो, असे त्याने सांगितले आहे. जयंत पाटील साहेब बोलून घेतील. तुम्ही ईडीकडे तक्रार करा. मग त्यांनी कारवाई केली नाही की दर दोन दिवसांनी पत्रपरिषद घ्यायची. तुम्ही आरोप करा. मग आम्ही हायकोर्टात जाऊ. तोवर मेडिकलची फाईल सापडेल.
भाजपाला 10 कोटी रुपये देणगी मिळाली, याची तुम्ही तक्रार करा. या एका पत्रामुळे नवाब मलिकची चौकशी स्टॉप होईल.


व्हीडिओ 31 एफ 
अ‍ॅड. एम. डी. पाटील यांचा कॉल येतो आणि ते रश्मी शुक्ला प्रकरणात टेलिग्राफ अ‍ॅक्टनुसार ओपीनियन ड्राफ्ट करून मागतात. सदर वकिल त्यांना ते ड्राफ्ट करून पाठवितो, असे उत्तर देतात. अ‍ॅड. एम. डी. पाटील हे पुण्यातील सरकारी वकील आहेत रश्मी शुक्ला प्रकरणात.


व्हीडिओ 32-जी-एच
वकिल : साहेबांनी नगराळेला सांगितले, जयंत पाटील यांनी सांगितले. पण, ऐकतच नाही, काय करायचे?
साहेब म्हणाले, तुला जे जे पाहिजे ते ते कर.
फोन टॅपिंग प्रकरणात मी खूप मागे लागलो, तेव्हा कुठे गुन्हा दाखल झाला.
वकिल : आपले जजेस आणायचे. कोर्टात थोडी आरडाओरड करायची आणि मग जजने ऑर्डर करायची.


व्हीडिओ 34-जे 
सरकारी वकिल म्हणतात,
नवाब मलिक यांनी सांगायचे असते की, हा जो फ्रॉड आहे तो मला देवेंद्र फडणवीस यांनीच करायला सांगितला.
जे 10 कोटी भाजपाला दिले, ते डोनेट करायला मला देवेंद्र फडणवीस यांनीच सांगितले आणि मी ते केले, असेही सांगायचे.
ते गोटे यांना विचारतात, 2014 मध्येच डोनेट केले ना? केव्हा केले निवडणुकीच्या आधी की नंतर?
जोरदार पत्रपरिषद घ्या!


जयंत पाटील यांना कॉल
अनिल गोटे जयंत पाटील यांना फोन लावतात आणि म्हणतात, आम्हाला भेटायचे आहे, तुम्हाला अर्जंट. उद्या मुंबईत भेटायचे काय?
मग हा फोन अ‍ॅड. चव्हाण यांना देतात. मग ते बोलू लागतात, मागचे विषय राहिले आहेत. आता पांडे साहेब आले आहेत. मेडिकलची फाईल आहे. उद्या किती वाजता? 3 वाजता का? यांना एक तक्रार ड्राफ्ट करून देतो आहे. उद्या ते ईडीकडे जाणार आहेत. या कॉलवर बोलले तर चालेल ना. जयंतराव सांगतात, फेसटाईमवर बोला. मग फेसटाईमवर फोन लावला जातो. पण, जयंतराव उचलत नाहीत.


व्हीडिओ 35-के
वकिल महोदय अनिल गोटेंना सांगतात.
जोरदार आरोप करा आणि सांगा की यातील एकही आरोप खोटा निघाला तर सर्व प्रॉपर्टी दान करून टाकीन. असे करण्यापूर्वी सर्व संपत्ती आपल्या मुलाच्या नावे करून टाका.
वकिल : तुम्ही आरोप करायचे आणि मग आपल्या लोकांना सभागृहात बोंबाबोंब करायला लावायची.


महाराष्ट्रात चालले काय ? सरकारी वकील विरोधकांना गुंतवणार असेल तर कस…जे जे या व्हीडीओ बोलले ते सगळे खोट्या केसस केल्या सगळे पुरावे व्हीडीओ दिले आता गृहमंत्र्यांनी कारवाई करा अशी मागणी फडणवीस यांनी केली.