मुंबई: राज्यातील सत्तावाटपाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घ्यायचे ठरवले आहे. भाजप आणि आमच्यात कोणतीही चर्चा सुरु नसल्याचे शिवसेना वारंवार सांगत आहे. मात्र, आता स्वत: देवेंद्र फडणवीस टाळीसाठी हात पुढे करणार आहेत. तेव्हा आता उद्धव त्यांना टाळी देणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट; भाजपकडून शिवसेनेला निर्वाणीचा इशारा


'झी २४ तास'ला मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस हे आज किंवा उद्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून किंवा त्यांना भेटून चर्चा करतील. शिवसेनेच्या गोटातूनही या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेना आणि भाजपच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांकडून एकमेकांना इशारे-प्रतिइशारे दिले जात आहेत. त्यामुळे युतीमधील वातावरण गढूळ झाले होते.


काश्मीरमध्ये भाजप आणि पीडीपीची विचारधारा समान होती का; संजय राऊतांचा सवाल



या पार्श्वभूमीवर दिल्लीतून पक्षश्रेष्ठींनी देवेंद्र फडणवीस यांना हा तिढा सोडवण्याचे आदेश दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत युती ही भक्कम राहिलीच पाहिजे. शिवसेना-भाजपमधील सध्याच्या वातावरणामुळे विरोधकांचे फावू शकते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी थेट उद्धव यांच्याशीच चर्चा करावी. २०१४ मध्ये भाजपने प्रथम सरकार स्थापन केले होते. त्यानंतर शिवसेना त्यामध्ये सहभागी झाली होती. मात्र, यंदा कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला सोबत घेऊनच सरकार स्थापन झाले पाहिजे, असा आदेशही दिल्लीतून देण्यात आला आहे.