मुंबई : अमरावती, नांदेडमध्ये झालेली दंगल ही सरकार पुरस्कृत होती, सरकारच्या समर्थनानं हे मोर्चे निघाले, असा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. आता सरकारविरोधात रस्त्यावर संघर्ष अटळ असल्याचा इशारा फडणवीसांनी दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ध्रुवीकरण करण्याचा प्रयोग


भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची आज बैठक पार पडली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. मालेगावची घटना साधी नाही, देशात ध्रुवीकरण करण्याचा हा एक प्रयोग आहे, महाराष्ट्रात हजारो लोक अचानक एकाचवेळी मोर्चा कसे काढतात, संपूर्ण सरकारच्या मदतीन मोर्चे काढले जातात, मु्ददाम हा भेद करण्याचा प्रयोग केला जातो. हिंदुंची दुकानं जाळली जातात, त्यावेळेस मात्र महाविकास आघाडी नेत्यांची तोंड शिवलेली असताता, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे.


देशात अशांतता निर्माण केली जातेय


कोणतीही घटना घडली नाही, मशीद जाळली म्हणून वेगळेच फोटो दाखवले जातात, जून्या मिरवणूकीचे फोटो दाखवून बघा त्रिपुरात हिंदु हल्ले होतात हे सांगतात, देशात अशांतता निर्माण केली जाते. राहुल गांधी यांना याची कल्पना होती, पण मु्द्दाम वेगळे वातावरण निर्माण केलं गेलं असा आरोप फडणवीस यांनी केला आहे. 


हा पॅटरन समजून घ्या
आझाद मैदान इथल्या घटनेत पोलीस जखमी आणि आता एसआरपीएफ जवान जखमी, नेमके हे करणारे कोण? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केल आहे. पोलीसांना मारहाण करणाऱ्या एकालाही अटक नाही, हा पॅटर्न समजून घ्या, मोदी यांच्या विकासला उत्तर देता येत नाही तिथ अल्पसंख्याक विभाजन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 


महाराष्ट्र अनेक मोठे नेते, आदिवासी अन्याय झाला म्हणूनच नक्सल विचाराकडे वळले हे त्यांचे म्हणणं चुकीचं असल्याचं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावरही टीका केली आहे.


भाजप दंगल करत नाही
आम्ही दंगल करणारे लोक नाही. भाजप कधी दंगल करत नाही. पण आमच्या अंगावर कोणी चालून आलं तर आम्ही शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही. यापुढे आम्ही हिंदूंची दुकाने जळू देणार नाही. सरकार अशा घटनांना आशीर्वाद देणार असेल तर हिंदू रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे.