मुंबई : Maharashtra Political News : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात पुढील वर्षी मार्च महिन्यात भाजपचे सरकार येणार असा दावा केला. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार  (Sharad Pawar) दिल्लीत भेटल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. मात्र, त्यांची खरी भेट झाली का? यावर राष्ट्रवादीकडून उत्तर आले. (Did Amit Shah and Sharad Pawar and Devendra Fadnavis meet in Delhi?)


तो फोटो BJPच्या आयटी सेलचा 'फर्जीवाडा' - राष्ट्रवादी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इस्त्रायलचे वाणिज्यदूत कोब्बी शोशानी आणि शरद पवार यांच्या भेटीचा फोटो मॉर्फ केला गेला आहे. याबाबत ट्विट राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे. पवार आणि कोब्बी शोशानी यांची भेटीचा फोटो मलिक यांनी ट्विट केला आहे. हाच फोटो एडिट करुन तो दाखविण्यात आला आहे. हा सगळा प्रकार भाजपच्या आयटी सेलचा आहे. हा त्यांचा फर्जीवाडा आहे, असे मलिक यांनी नमुद केले आहे.



देवेंद्र फडणवीस हे सरकार जास्त काळ टिकणार नाही, अशी भविष्यवाणी करुन थकले. त्यानंतर चंद्रकांत पाटील झोपेतून जागे झाले आणि सरकार जाण्याच्या घोषणा करु लागले. मात्र आता तो मोर्चा नारायण राणे यांनी सांभाळला आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते  नवाब मलिक म्हणाले.


शरद पवार यांचा खरा फोटो



दिल्लीत भाजपच्या नेत्यांची बैठक झाली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी दिल्लीत पक्षश्रेष्ठीं भेट घेतली. विशेष म्हणजे गुरूवारी चंद्रकांत पाटील यांनी अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी दुसऱ्या दिवशी अमित शाह यांची स्वतंत्रपणे भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला. (Political developments in Delhi) शरद पवार यांनी राज्यातील नियोजित कार्यक्रम रद्द करुन दिल्लीकडे रवाना झाले. त्यानंतर राणे यांचा नव्या वर्षात भाजप सरकार येणार असल्याचा दावा. त्यानंतर पवार, शाह, फडणवीस यांच्या भेटीचा फोटो. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली. मात्र, हे सगळे फेक असल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले आहे.