मुंबई : विधानपरिषद निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. निवडणुकीत कॉंग्रेसच्या एका उमेदवाराला पराभव पत्कारावा लागला. निवडणुकीत शिवसेना उमेदवारांनाही काठावर मतं मिळाली. म्हणजेच शिवसेना आणि कॉंग्रेसची मतं फुटल्याचे स्पष्ट झाले. आज शिवसेनेच्या पहिल्या फळीतील मोठे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक शिवसेना आमदार नॉटरिचेबल असून ते सूरतमध्ये असल्याची माहिती मिळतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकनाथ शिंदे थेट भाजपच्या संपर्कात असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. परंतू शिवसेनेसाठी धक्का मानली जाणारी या घडामोडीची कुणकूण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना होती का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.


काल सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मतदानासाठी विधानभवनात आले तेव्हा मिटींग रूममध्ये येताच त्यांनी पहिल्यांदा 'एकनाथ शिंदे कुठे आहेत असं विचारले...त्यांना सांगून ठेवलंय ना..?' असंही उद्धव ठाकरेंनी विचारलं.


यावरून एकनाथ शिंदे नाराज आहेत हे उद्धव ठाकरेंना आधीपासून माहित होतं का? असा प्रश्न उपस्थित होतोय. त्यामुळे मतदानाआधी ते एकनाथ शिंदेंची चौकशी करत होते.