मुंबई : महाराष्ट्रातल्या एका शेतकरी तरुणाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांना पत्र लिहलं आहे. सध्या हे पत्र सोशल मीडियावर चागलंच व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेतकरी होऊन प्रेम करणं खरच चुकीचं असतं का? असा सवाल या तरुणाने मुख्यंत्र्यांना विचारला आहे. तुम्हाला भेटून खूप रडावसं  वाटतं, उद्धवसाहेब तुम्ही सगळ्यांचं ऐकून घेता, त्यांचे प्रश्न सोडवता? माझं काय? असंही आपल्या पत्रात या तरुणाने म्हटलं आहे. 


तरुणाने पत्रात काय म्हटलं आहे?
मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब... साहेब लिहताना खुप दु:ख होतं, साहेब तुम्ही कधी कुणावर प्रेम केलं होतं का हो... तुमचं महाराष्ट्रावर खूप प्रेम आहे. पण आयुष्यात कधीतरी केलं असेल तर उत्तर द्या, प्रेम हे धन दौलतच मोहताज असतं, अहो मी पण कुणावर तरी प्रेमं केलं होतं. पण शेत जमीन कमी असल्याने कोणी प्रेमाला विरोध केला असं असतं का हो?


मी ऐकलं होतं हिर रांजा, लैला-मजनू, शिरी फरहाद, सोनी महिवाल यांनी जर प्रेम केलं असेल तर मृत्यू का? प्रेमात विरह का असतो? ज्या प्रेमात विरह नसेल तर त्याचा मी धिक्कार करतो. तुम्ही तुमच्या महाराष्ट्रातील एका तुमचा मुलासाठी वहिनीला विचारा खरंच असं असतं का?



साहेब शेतकरी होऊन प्रेम करणं चुकीचं आहे का? खरं तर तुम्हाला भेटून खूप रडावं वाटतं. उद्धव साहेब आजपर्यंत तुम्ही सगळ्यांचं ऐकूण घेता, त्यांचे प्रश्न सोडवता, या पुरोगामी महाराष्ट्रात प्रेमात आत्महत्या करावी लागत असेल तर मी प्रेमाचा धिक्कार करतो. आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर द्याल याची वाट पाहतो. अन्यथा या जगातून निघून जाणे व्यतिरिक्त माझ्याकडे पर्याय नाही. असं या तरुणाने आपल्या पत्रात लिहिलं आहे. 


या पत्रात तरुणाने आपलं नाव लिहिलेलं नाही. पण हा तरुणा हिंगोलीतला असल्याची माहिती समोर आली आहे.