Mumbai Local Train Update: मुंबई लोकल ही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. लोकल प्रवास सुखाचा व्हावा यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्नशील आहे. मुंबई पश्चिम उपनगरी रेल्वे डब्यांवर लवकरच पॅनोरमा डिजिटल डिस्प्ले बसवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आता रेल्वे प्लॅटफॉर्मकडेच्या बाजूने देखील सर्व माहिती समजणार आहे.  ही माहिती इंग्रजी, मराठी आणि हिंदी अशा तिन्ही भाषांमध्ये ३ सेकंदांच्या अंतराने दिसणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईकरांची लोकल चुकली ही पुढचं सगळं गणित बिघडतं. कधी कधी रेल्वेची उद्घोषणा झाली नाही तरी लोकल कोणी येणार हे कळत नाही तर, कधी प्लॅटफॉर्मवरील इंडिकेटरदेखील धोका देते. अशावेळी सकाळ सकाळ मुंबईकरांची तारांबळ उडते. तसंच, प्लॅटफॉर्मला कोणी लोकल लागली आहे, हे देखील कळत नाही. त्यासाठीच आता पश्चिम रेल्वेने काही बदल केले आहेत.  पश्चिम रेल्वे आता लोकलवर डिजिटल डिस्प्ले लावणार आहे. लोकलवरच्या डिजिटल डिस्प्लेवर प्लॅटफॉर्मवर लागलेली लोकल कोणती आहे व किती डब्ब्यांची आहे, हे प्रवाशांना समजणार आहे. एक्स्प्रेस ट्रेनप्रमाणे आता लोकलला डिजीटल डिस्प्ले बसवण्यात येणार आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर डिजीटल डिस्प्लेचा प्रयोग केला जाणार आहे. 


उपनगरी रेल्वेच्या १२ डब्यांच्या गाडीच्या दर्शनी भागावर दोन्ही बाजूला मिळून एकूण आठ डिजिटल डिस्प्ले बसविण्यात येणार आहेत. ज्यामुळे प्रवाशांना ट्रेनचा क्रमांक, ट्रेन सुरू होण्यापूर्वी गार्डने दिलेली माहिती आता प्लॅटफॉर्मवर बसूनदेखील मिळविणे शक्य होणार आहे. सध्या एका गाडीवर असा डिस्प्ले बसविण्यात आला असून, येत्या काळात पश्चिम रेल्वेच्या आणखीन १० गाड्यांवर असे डिस्प्ले बसविण्यात येणार आहेत. 


काय आहे पॅनरोमा डिस्प्ले?


- हे डिजिटल डिस्प्ले फुल एचडी टीएफटी (थिन फिल्म ट्रान्झिस्टर) आहेत.


- हे डिस्प्ले काचेने संरक्षित आहेत


- त्याची ब्राइटनेसमुळं लोकांना स्क्रीनवर कोड सहज पाहता येईल


- डिस्प्ले स्क्रीनचा कॉन्ट्रास्ट सेन्सरद्वारे स्वयंचलितपणे नियंत्रित केला जातो जेणेकरून मजकूर 5 मीटरपर्यंतच्या अंतरावरून स्पष्टपणे दिसतो


- डिस्प्लेची किंमत अंदाचे १.७५ लाख रुपये इतकी असून, रेल्वेच्या एका गाडीवर बसविण्याचा खर्च सुमारे १४ लाख इतकी असणार आहे.