मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वळसेपाटील यांची अखेर विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. याआधी भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांची निवड करण्यात आली होती. पण उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर, महाराष्ट्र विकास आघाडीने हंगामी अध्यक्ष बदलण्याची मागणी केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हंगामी अध्यक्ष बदलण्यासाठी महाराष्ट्र विकास आघाडीने राज्यपालांना पत्र देखील दिलं होतं, पण भाजपकडून हंगामी अध्यक्ष बदलू नये अशी मागणी होत होती. मात्र अखेर राज्यपालांनी राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वळसेपाटील यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी निवड केली आहे.


यापूर्वी कालिदास कोळंबकर हे हंगामी अध्यक्ष होते. त्यांच्या हस्ते नवनियुक्त आमदारांना आमदारकीची शपथ देण्यात आली होती.


सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पहिल्याच दिवशी हंगामी अध्यक्षपदावरून संघर्ष पाहायला मिळाला. येत्या काळातही हा संघर्ष दिसून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. 


कारण भाजपच्या नेत्यांना विरोधी बाकावर बसण्याचा अनुभव आहे. एक मजबूत विरोधक जे मागील 5 वर्षात दिसले नाहीत, ते आता भाजपच्या रूपात दिसून येत आहेत.